मेट्रो नियो काळाजी गरज - दीक्षित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ नोव्हेंबर २०१९

मेट्रो नियो काळाजी गरज - दीक्षित


• *मेट्रो नियो - एक उपयुक्त पर्यायी वाहतूक व्यवस्था*
 
*नागपूर १६ :* मेट्रो नियो प्रवाश्यांकरिता एक योग्य मोबिलिटी पर्याय असून, मोठ्या आणि महत्वाच्या शहरांमध्ये वर्दळीच्या वेळेला वाहतुकीचे पर्यायी साधन म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो असा विश्वास महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला. १२ व्या ‘अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित गोलमेज बैठक मध्ये `सर्वांकरिता सार्वजनिक परिवहन' या विषयांवर डॉ. दीक्षित बोलत होते.

डॉ. दीक्षित यांनी उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले कि मेट्रो नियो प्रकल्प हा त्या शहराकरीता उपयुक्त ठरू शकतो ज्या शहरामध्ये सर्वात जास्त वर्दळ असते त्या वेळेवर ५,००० ते १५,००० नागरिक प्रवास करत असतात. सदर मेट्रो नियो प्रकल्प परिपूर्ण असून यावर होणारा खर्च इतर प्रकल्पाच्या तुलनेत कमी आहे. भारतामध्ये मेट्रो वाहना ऐवजी `लाईट मेट्रो' (मेट्रो नियो) हा वाहतुकीच्या समाधानाकरता सर्वांना परवडण्याजोगे पर्याय आहे.

राज्य सरकारने नाशिक करिता `मास ट्रांजीट सिस्टम' अंतर्गत मेट्रो नियोला मान्यता दिली आहे. महा मेट्रोला या प्रकल्पाच्या अंबलबजावणीची जबाबदारी देखील दिली आहे. देशात अश्या प्रकारे राबविली जाणारा मेट्रो नियो हा पहिलाच प्रयोग आहे. नाशिक येथे सुरक्षित विश्वसनीय आणि आरामदायी सार्वजनिक प्रवासी वाहतूकीला चालना देण्याची जबाबदारी महा मेट्रोला राज्य शासनाने नोव्हेबर २०१८ ला दिली होती.

सर्व साधारणपणे २०-३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याकरता विविध उपायांवर केंद्र सरकार विचार करत होती. अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर केंद्र सरकारने २१ ऑगस्ट २०१९ ला महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापित केली. टायरवर धावणारी जलद गती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासंबंधी सर्व बाबींवर विचार करण्याकरता तसेच या बाबीत एकवाक्यता आणण्याकरता या समितीची स्थापना केली होती.

महा मेट्रो तर्फे राबवल्या जाणाऱ्या या अनोख्या मेट्रो नियो प्रकल्पासंबंधी माहिती देण्याकरता लखनऊ येथे या बैठकिचे आयोजन करण्यात आले. या प्रकल्पावर यशस्वीपणे चर्चा होत महा मेट्रोच्या कार्याचे कौतुक देखील उपस्थितांनी केले. या बैठकीत श्री. दुर्गा शंकर मिश्रा, सचिव (शहरी विकास) मंत्रालय, भारत सरकार, श्री. राजेंद्र कुमार तिवारी,(मुख्य सचिव,उत्तर प्रदेश) श्री. प्रसन्ना पटवर्धन, संचालक (प्रसन्ना पर्पल), डॉ. एव्सेल फ्रेडरिच (जर्मन पर्यावरण एजंसी), श्री. आर. के. मिश्रा (अध्यक्ष–युलो बाईव्स) उपस्थित होते.