महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ नोव्हेंबर २०१९

महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा

नागपूर/प्रतिनिधी:
Image may contain: 4 people, people smiling, people standing and text
 दुपारी साडेतीन वाजता नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रशांत दळवी लिखित व अनिल बोरसे दिग्दर्शित 'ध्यानी मनी' हे नाटक सादर करण्यात येणार आहे.

या नाट्य प्रयोगास उपस्थित राहून अत्यावश्यक सेवेत राहूनही अभिनयाच्या क्षेत्रात भरारी मारू पाहणाऱ्या कलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महावीतरणतर्फे करण्यात येत आहे.

ठाण्यातील डॉ. घाणेकर नाट्यगृहात दि. २५ व २६ नोव्हेंबर रोजी महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत झालेल्या आंतर परिमंडल स्पर्धेत अव्वल ठरलेल्या नाटकांचे सादरीकरण या दोन दिवशीय स्पर्धेत होईल. स्पर्धेच्या निमित्ताने ठाणेकर रसिक प्रेक्षकांना महावितरणमधील कलावंतांच्या अभिनयाची मेजवानी मिळणार असून नाट्य प्रयोगांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.