कोलामगुड्यालगत लालमाती उत्खननचा परवाना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० नोव्हेंबर २०१९

कोलामगुड्यालगत लालमाती उत्खननचा परवाना

 


कोलामांनी केली विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल


चंद्रपूर/प्रतिनिधी 
जिवती तालुक्यातील रायपूर या कोलामगुड्यालगत लालमाती उत्खननचा परवाना देण्यात आला असून, या खदानीत रायपुरच्या 14 कोलामांच्या शेतजमीनी जात असून, परीसरातील जंगलालाही मोठी हाणी होऊन पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. एकीकडे दुर्मिळ असलेल्या आदिम कोलामांच्या संवर्धनाच्या योजना बनविल्या जात आहे. तर दुसरीकडे कोलामांना विस्थापित करण्याचे कारस्थान रचले जात आहे. 
कोलामगुड्यालगत किंवा कोलामांचा उदरनिर्वाहाचे साधन म्हणून देण्यात आलेल्या शेतजमीनींवर कुठल्याही प्रकारच्या उत्खननाचा परवाना देऊन कोलामांवर होत असलेल्या अन्यायाविरूध्द कोलाम विकास फाऊंडेशनने मा. विभागिय आयुक्त, नागपूर यांना निवेदन देऊन परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
अन्यथा या मागणीसाठी आंदोलन करण्याची मानसिकता कोलामांनी बनविली आहे.