इरई नदीवरिल जुन्या पुलाचा बंधारा बनवा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ नोव्हेंबर २०१९

इरई नदीवरिल जुन्या पुलाचा बंधारा बनवा

  •  इको-प्रो ची मागणी
  • जिल्हयातील नदीवरिल जुने पुलाचे बंधारे म्हणुन रूपांतर करण्याची आवश्यकता
  • इको-प्रो चे जिल्हाधिकारी यांना निवेदन
  • नदी-नाल्यावर ठिकठिकाणी बंधारे भुजल पुर्नभरण व सिंचन दृष्टीने महत्वाचेचंद्रपूरः इरई नदीवर पठाणपुरा गेट बाहेरील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या पुलामुळे बाजुला असलेल्या जुने पुलांचे रूपांतर बंधारा मध्ये करण्याची मागणी इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केलेली आहे.

जिल्हयात दिवसेगणीक होत असलेली भुजल पातळीतील घट चिंताजनक आहे. तसेच पावसाळयाच्या दिवसांत अनेक नदी-नाले दुथळी भरून वाहतात मात्र पावसाळा संपताच कोरडया होेतात. या सर्व नदयाचे स्वरूप आता हंगामी अशा स्वरूपाचे उरले आहे. भर उन्हाळयात तर या नदी-नाल्यास पाणी सुध्दा नसते तेव्हा अशा पध्दतीचे किमान पुलांचा बंधाÚयात रूपांतर करण्याचे कार्य हाती घेतल्यास जलसंवर्धनाच्या दृष्टीने महत्वाचे कार्य होऊ शकते. तसेच नदीलगतच्या शेतीना सुध्दा सिंचनाची तर जनावरांना पाण्याची सोय काही प्रमाणात सोय होऊ शकेल.

भुजल पुर्नभरणाची गरज लक्षात घेऊन ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ काळाची गरज झालेली आहे. इको-प्रो च्या माध्यमाने शहरात ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग व शोषखड्डा’ बांधकाम करण्यात यावे करिता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गतच चंद्रपुर शहरास वेढुन वाहणाÚया इरई व झरपट नदीवर सुध्दा ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आल्यास शहरास लागुन वाहणाÚया या नदयामुळे शहरातील भुजल पातळी वाढण्यास मदत होईल.

चंद्रपूर तालुक्यातील बांधकाम सुरू असलेले दाताळा रोड व पठाणपुरा बाहेरील दोन्ही इरई नदीवरील पुलांचे बांधकाम झालेले आहे. तात्काळ स्वरूपात शक्य असलेले पठाणपुरा बाहेरील व दाताळा रोड वरील नव्या पुलांच्या बांधकामानंतर उपयोगात नसलेल्या या दोन्ही जुन्या पुलांचे बंधाÚयात रूपांतर करणे सहज शक्य असुन  यासंदर्भात सार्वजनीक बांधकाम विभागास सुचना देण्यात याव्या अशी मागणी करण्यात आलेली असुन याबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिलेले आहे.

सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत जिल्हयातील पहीलाच प्रयोग असलेला ‘जानाळा-पोभुर्णा’ रोडवरील अंधारी नदीवरील पुलांचे पुल आणि बंधारा असे बांधकाम करण्यात आले आहे. जिल्हयात वाहणाÚया वर्धा, उमा, अंधारी, पोथरा, इरई, झरपट आदी नदीवर ठिकठिकाणी नविन पुलांचे बांधकाम झालेले आहे किंवा होणार आहे त्याठिकाणी नदीवरील जिल्हयात शक्य असेल तिथे बंधारे बांधण्याची, नविन पुल बांधकाम नंतर जुने पुल असल्यास त्यांचे रूपांतर बंधारा मध्ये करण्याची मागणी सुध्दा निवेदनातुन करण्यात आलेली आहे.