नेहरू वाचनालयात पं.जवाहरलाल नेहरू व बालदिन उत्साहात साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ नोव्हेंबर २०१९

नेहरू वाचनालयात पं.जवाहरलाल नेहरू व बालदिन उत्साहात साजरा

      मायणी :-सतीश डोंगरे
            येथील तालुकास्तरीय ग्रंथालयाची मान्यता असणारे नेहरू वाचनालय मायणी येथे देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १३० वी जयंती व यादिवसाच्या निमित्ताने साजरा करण्यात येणार 'बालदिन'  उत्साहात साजरा करण्यात आला. 
              पंडित नेहरू यांच्या स्मृती प्रित्यर्थ नेहरू वाचनालय या नावाने या ग्रंथालयाची स्थापना १४ नोव्हेंबर १९६६ रोजी करण्यात आली होती .यास १९६७मध्ये शासन मान्यता मिळाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या व महामानवांच्या प्रेरणेतून कार्य करणारे हे ग्रंथालय सध्या ग्रंथालयाचे अध्यक्ष व मायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव सुधाकर कुबेर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत असून याठिकाणी पंचवीस हजार  ग्रंथ ,पंधरा दैनिके, अकरा साप्ताहिक, तीस मासिके असे दैनंदिन रित्या ज्ञानभंडाराने संपन्न असलेले ग्रंथालय म्हणून प्रसिद्ध आहे. या ग्रंथालयामध्ये स्वतंत्र स्पर्धा परीक्षा विभाग, महिला व बाल विभाग व इंटरनेट सुविधा सह कार्यकरीत असणारा संगणकीय विभागही या ठिकाणी असल्याची माहिती ग्रंथालय व्यवस्थापक अमोल गरवारे यांनी दिली.
             त्याचबरोबर आज साजरा करण्यात येणारा बालदिनही लहानग्यांना खाऊ वाटप करून आनंदात साजरा करण्यात आला.यावेळी माने सर,सुनील लोहार यांचेसह इतर वाचक ,ग्रामस्थ ,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.