किल्ला पर्यटनातून वारसा संवर्धनाचा संदेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ नोव्हेंबर २०१९

किल्ला पर्यटनातून वारसा संवर्धनाचा संदेश  • संगिनी महिला ग्रुप परिवारासह हेरिटेज वाॅक 
  • नागरिकांचा वाढता प्रतिसाद
  • पावसाळयानंतर पहिला हेरिटेज वाॅक 
  • इको-प्रो चा उपक्रम

चंद्रपूरः इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने पावसाळयानंतर प्रथमच आज हेरिटेज वाॅक - किल्ला पर्यटनाचे आयोजन करण्यात आलेले होते यात संगिनी महिला गृपच्या सदस्या आपल्या परिवारासह मोठया संख्येने सहभागी झालेल्या होत्या.
इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने मागील 806 दिवसापासुन चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान सुरू असुन मागील 44 रविवार पासुन पहाटे सकाळी 06ः00 ते 09ः00 या दरम्यान किल्ला पर्यटन-हेरिटेज वाॅक या उपक्रमाची सुरूवात करण्यात आलेली आहे. पावसाळयानंतर या पहिल्या हेरिटेज वाॅक उपक्रमात शहरातिल ‘संगिनी महिला क्लब’ च्या सदस्या आपल्या परिवारासह सहभागी झालेल्या होत्या. यासोबत वनविभागातील कर्मचारी सुध्दा सहभागी झाले होते.
बगड खिडकी ते अंचलेश्वर मंदिर असा किल्ला पर्यटन परकोटाच्या भिंतीवरून ऐतिहासिक माहीतीसह सफर पुर्ण केली जाते. या प्रवासा दरम्यान किल्ला स्वच्छता अभियान, गोंडकालिन इतिहासाची माहीती संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे पर्यटक मार्गदर्शक म्हणुन माहीती सांगीतली जाते. बुरूज क्रमांक 4,5,6,7,8 व 9 असा प्रवास करतांना मानवी हस्तक्षेप, अतिक्रमण, निसर्ग, वाढलेली झाडे, पुरांचा फटका यामुळे कशी वाताहत झाली, किल्लाच्या काठावरिल नागरिकांचा सहभाग, भविष्यातील किल्ला पर्यटन, पुर्णबांधकाम, संरक्षण भिंतीचे बांधकाम, पाथवे, सायकल ट्रेक आदी विषयी माहीती देण्यात आली. किल्ला पर्यटना दरम्यान नागरीकांच्या विवीध प्रश्नाची माहीती सुध्दा देण्यात आली.
यावेळी संगिनी महिला क्लबच्या अध्यक्षा सुचिता राठी, सचिव अश्विनी आंबटकर, कोषाध्यक्ष सरिता संघई सह डाॅ वैशाली कांबळे, डाॅ स्मिता भांडेकर, डाॅ निता गीरी, लता नायडु, सरिता संघई, ज्योती कोतपल्लीवार, तेजश्री वंरगटीवार, अनुजा मामीडवार, स्मिता सावलीकर, रजनी मुनगेलवार व अनेक महीला सदस्या उपस्थित होत्या. सोबतच डाॅ अशोक भुक्ते, डाॅ गाडेगोणे, डाॅ विजय गिरी, डाॅ. अजय दुदृदलवार, डाॅ राजेश कांबळे, डाॅ महेश भांडेकर, डाॅ सुनिल संघई, डाॅ तातावार, डाॅ नवल राठी, डाॅ शार्दुल वरंगटीवार, डाॅ आंबटकर, डाॅ नायडु आदी आपल्या परिवारासह सहभागी झाले होते. वनविभागाचे संतोष अतकरे सह वनकर्मचारी सुद्धा सहभागी झाले 
हेरिटेज वाॅक - किल्ला पर्यटन
हेरिटेज वाॅक किल्ला पर्यटन म्हणजे इको-प्रो संस्थेने किल्ला स्वच्छता नंतर शहरातील ऐतिहासिक वारसा माहीतीसह प्रत्यक्ष वास्तु-स्मारकांची सफर करित इतिहास जाणुन घेण्याकरिता सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे. या उपक्रमात नागरीक-पर्यटक प्रत्येक रविवारला पहाटे सहा वाजता बगड खिडकी लगतच्या रामाळा तलावास लागुन असलेल्या बुरूजावर एकत्रित येतात. या बुरूजापासुन ते अंचलेश्वर गेट पर्यत परकोटावरून पायी चालत ही सफर पुर्ण केली जाते. विवीध बुरूज, किल्लाचा वेगवेगळया भागातुन प्रवास, बगड खिडकी, मसन खिडकी व अन्य खिडकी, दरवाजे सोबतच या दरम्यान ऐतिहासिक माहीतीसह चंद्रपूरचा इतिहास जाणुन घेण्याची संधी नागरीकांना मिळते. यामुळे शहराती ऐतिहासिक पर्यटन व विकासाच चालना मिळेल अशी आशा आहे.
मागील 30 दिवसापासुन सतत हेरिटेज वाॅकच्या मार्गाची स्वच्छता
मागील 30 दिवसापासुन सतर हेरिटेज वाॅकच्या मार्गाची स्वच्छता करण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरू होते. पावासाळयानंतर आलेले झाडी-झुडपे काढुन पुर्ववत करणे तसेच यंदाच्या पावसाळयात बगड खिडकी लगतच भिंत व बुरूज सात जवळचा काही कोसळल्याने हा मार्ग चालण्यायोग्य करण्याचे आवाहन इको-प्रो च्या टिमपुढे होते. इको-प्रो च्या सदस्यांनी सतर श्रमदान करित स्वच्छता व रस्ता योग्य करण्याचे काम पुर्ण केल्याने नियोजीत हेरिटेज वाॅकच्या तारखेपासुन पंधरा दिवस उशिरा का होईना परत हेरिटेज वाॅक परत सुरू झालेला आहे.
इको-प्रो चे आवाहन
हेरिटेज वाॅक दरम्यान सहभाग होणाÚया पर्यटकांची संख्या मर्यादित असल्याने, नागरिकांनी आधिच आपली नियोजीत तारिख व संख्या कळविल्यास हेरिटेज वाॅक दरम्यान गर्दी किंवा इतर अडचणी निर्माण होणार नाही. नागरीकांना सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे व इको-प्रो पुरातत्व विभाग उपप्रमुख कपील चैधरी यांनी केले आहे. आज हेरिटेज वाॅक दरम्यान संस्थेचे नितीन रामटेके, धर्मेद्र लुनावत, सुनिल मिलाल, सुधिर देव, सुमित कोहळे, अभय अमृतकर, वैभव मडावी, राजु काहिलकर, सचिन धोतरे, सुनिल पाटील, सौरभ शेटे, प्रमोद मलिक, संजय सब्बनवार, जयेश बैनलवार सहभागी होत सहभागी नागरीकांना सहकार्य व माहीती देण्याचे कार्य केले.