चंद्रपूर:रेतीच्या ढिगाऱ्याखाली दबून वेकोली कर्मचाऱ्यांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ नोव्हेंबर २०१९

चंद्रपूर:रेतीच्या ढिगाऱ्याखाली दबून वेकोली कर्मचाऱ्यांचा मृत्यू

 महाकाली कॉलरी येथील घटना
चंद्रपूर/प्रतिनिधी:
मंगळवारी रेतीच्या ढिगाऱ्याखाली दबून वेकोली कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील महाकाली कॉलरी येथे घडली आहे.

माधव कोपुलवार वय 53 वर्षे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार माधव कोपुलवार हे सकाळच्या पाळीत कर्तव्यावर होते.मात्र अचानक रेतीचा ढिगारा कोसळला आणि यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती इतर कामगारांना मिळताच त्यांनी मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढला.यानंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी पोहोचून जमावाला शांत केले.मात्र या घटनेने वेकोलि कर्मचाऱ्यात व माधव कोपुलवार यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.