गोंडकालीन इतिहासाची साक्ष देणा-या १७ भव्य पेटिंग्सचे प्रदर्शन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ नोव्हेंबर २०१९

गोंडकालीन इतिहासाची साक्ष देणा-या १७ भव्य पेटिंग्सचे प्रदर्शनचंद्रपूर जिल्हा कारगृहातील बंदी बांधवासाठी ०४ विपश्यना व कला शिबीर  चंद्रपूर- जिल्हा कारागृह येथे बंदी बांधवासाठी कारागृह अधीक्षक वैभव आगे यांचे पूर्वपरवानगीने व प्रमुख मार्गदर्शनामध्ये प्रविण आर्ट चे संस्थापक प्रविण कावेरी यांचे वतीने बंदी बांधवासाठी आयोजित आनापान शिबीर संपन्न झाले. सदर समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्ह्णून कारागृहाचे श्री. वैभव आत्राम, प्रभारी अधीक्षक,कारागृह तर प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर शहरातील प्रसिध्द प्रविण कावेरी उपस्थित होते. तर कारागृहाच्या वतीने प्रमुख उपस्थितीमध्ये तुरुंगाधिकारी नागनाथ खैर, सुनिल वानखडे, विठ्ठल पवार, तुरुंग शिक्षक ललित मुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरवातीला मान्यवरांचे कारागृहाचे वतीने स्वागत करण्यात आले. तदनंतर प्रमुख मार्गदर्शक प्रविण कावेरी यांनी बंद्याना मनशांती करिता विपश्यनेचे महत्व प्रोजेक्टर वर चित्रफितीच्या माध्यमातून समजावून सांगीतले तदनंतर बंदी बांधवासाठी ५० मिनीटाचे आनापान सत्र घेण्यात आले. आनापान सत्रानंतर विपश्यना व कला यातून मिळणारी मन शांती व मानसिक समाधान याबाबत माहिती देण्यात आली. तसेच चित्रकार प्रवीण कावेरी यांनी चंद्रपूर च्या गोंडकालीन इतिहासाची साक्ष देणा-या १७ भव्य पेंटिंग चे प्रदर्शन बंद्याना इतिहासाची माहिती व्हावी या करिता लावण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव आत्राम यांनी बंद्याना शांती ही जगातील सर्वात किंमती गोष्ट असून दुषीत मनाला ती मिळू शकत नाही करिता आपले मने विपश्यनेच्या माध्यमातून स्वच्छ करावी व आपणास आवडणारी कला जोपासावी असे आव्हान केले. सदर ०४ दिवसीय विपश्यना व कला या शिबीराचे कारागृहातील आयोजन व सुत्रसंचलन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता सुभेदार सिताराम सुरकार, शिपाई लोकेश आराधे, परमेश्वर हत्तीमारे यांचे सह इतर कारागृह कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
फोटो :- बंद्याना मार्गदर्शन करतांना पी.के. स्टुडीऒ चे चित्रकार प्रविण कावेरी