वाडीत सीसीटीवी कॅमेरे व पोलीसांची संख्या वाढवा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ नोव्हेंबर २०१९

वाडीत सीसीटीवी कॅमेरे व पोलीसांची संख्या वाढवा


पोलीस आयुक्ताला भाजपाचे निवेदन 
नागपूर /अरुण कराळे 
वाडी शहरात ट्रान्सपोर्ट व्यवसाय व उद्योग धंदयात वाढ झाल्यामुळे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे तितक्याच संख्येने गुन्हेगारीत वाढ झाली असून चोरीच्या घटना वाढत आहे . 

वाडी पोलीस स्टेशन अतंर्गत असणाऱ्या गावामध्ये दोन लाख लोकसंख्येच्या मानाने पोलीसांची संख्या कमी प्रमाणात असल्यामुळे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या तसेच वाडीत सीसीटीवी कॅमेरे वाढविण्याची मागणी पोलीस आयुक्त भुषणकुमार उपाध्याय यांना निवेदनाद्वारे वाडी मंडळ भाजपा अध्यक्ष आनंदबाबू कदम , भाजपा वाडी अध्यक्ष तथा नगरसेवक केशव बांदरे, किताबसिंह चौधरी ,महेंद्र शर्मा,कैलास शर्मा,अजय तायवाडे,अनिल पुंड यांच्या उपस्थितीत दिले . 

वाडी पोलीस स्टेशन मध्ये जवळपास ८९ पोलीस कर्मचारी आहे .वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास दोन लाख लोकसंख्या आहे . लोकसंख्येच्या मानाने पोलीस कर्मचारी कमी पडत असल्यामुळे चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे . २५ ते ३० तरूणांचा घोळका एकत्र राहून तरूणीची छेडछाड करतात त्यासोबतच असामाजिक तत्वाचा त्रास वाढत असून अवैद्य धंदे जोरात वाढले आहे .

 त्यामुळे नागरीकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .वाडी पोलीस स्टेशन मध्ये अजून २५ पोलीस कर्मचारी वाढविले तर अवैद्य धंद्यावर तसेच चोरीच्या घटनेवर अंकुश लागू शकतो .

 मागील निवेदनात २५ पोलीस कर्मचारी वाढवून देण्याचे ठरले होते .वाडी शहरात काही प्रमाणात सीसीटीवी कॅमेरे लावले परंतू ते अल्प प्रमाणात असल्यामुळे चोरीच्या घटना उघडकीस येत नाही . अजून दहा ते बारा़ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे . 

असामाजीक तत्वाचा त्रास तरुणी व महीलांना होत असल्यामुळे संध्याकाळी तरुणी व महीला बाहेर जाण्यास घाबरतात . त्यामुळे यावर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीवी कॅमेरे व पोलीसांची संख्या वाढवा असेही निवेदनातून स्पष्ट केले .