राहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागावी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० नोव्हेंबर २०१९

राहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागावी


भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल खरेदी प्रकरणातून खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे 'दूध का दूध,पानी का पानी' होऊन जनतेला सत्य कळलं आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी राहुल गांधींनी मा. नरेंद्र मोदीजींची बदनामी केली. त्यामुळे त्यांनी देशातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी केली.

राफेल प्रकरणीच्या मा. सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावत, राहुल गांधींना माफी मागायला लावली. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधींनी देशवासियांची दिशाभूल करणे, आणि मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र भाई मोदी यांची बदनामी केल्याबद्दल संपूर्ण देशभर आंदोलन करण्यात येत आहे. याअंतर्गत दादर येथील वसंत स्मृती येथे महाराष्ट्र भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी होऊन, त्यांनी राहुल गांधींविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

यावेळी बोलताना मा. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, "स्वत:च्या स्वार्थासाठी एखादा व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो हे संपूर्ण देश पाहात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत राफेल प्रकरणावरुन मा. पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्यावर खोटे आरोप करुन, जनतेची दिशाभूल केली. या. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे दूध का दूध पानी का पानी होऊन, जनतेला खरं काय समजलं आहे. राहुल गांधींनी देशवासियांची दिशाभूल केल्यामुळे देशातल्या जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे."

मुंबई भाजपचे महामंत्री सुनिल राणे, माजी मंत्री योगेश सागर, महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी, राज पुरोहित, प्रवक्ते अतुल शहा यांच्या सह मुंबई महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.