पक्षी सप्ताहानिमित्त इको-प्रोतर्फे विद्यार्थ्यांसाठी पक्षीनिरिक्षण व स्वच्छता कार्यक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ नोव्हेंबर २०१९

पक्षी सप्ताहानिमित्त इको-प्रोतर्फे विद्यार्थ्यांसाठी पक्षीनिरिक्षण व स्वच्छता कार्यक्रम  • जुनोना येथिल सावित्रीबाई फुले विद्यलयाच्या विद्यार्थ्यांना सहभाग 

  • इको-प्रो पक्षि संवर्धन विभागाचा उपक्रम - गावांत पक्षि जनजागृती रॅली

चंद्रपूरः पक्षि सप्ताह निमित्त इको-प्रो संस्थे तर्फे जुनोना गावांतील शालेय विदयाथ्र्याकरिता पक्षि निरीक्षणाचा व जुनोना तलाव परिसर स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जागतिक किर्तीचे जेष्ठ पक्षितज्ञ डाॅ सलिम अली व महाराष्ट्रातील पक्षितज्ञ अरण्यऋषी श्री मारूती चितमपल्ली यांच्या जन्मादिनाचे औचित्य साधत 5 नोव्हे ते 12 नोव्हे यादरम्यान ‘पक्षि सप्ताह’ साजरा केला जातो. या दरम्यान इको-प्रो संस्थेच्या पक्षि संवर्धन विभागातर्फे जुनोना या जंगलव्याप्त गावातील सावित्रीबाई फुले विदयालयाच्या विदयाथ्र्याकरिता ‘जुनोना तलाव परिसरात पक्षि निरीक्षण व तलावप परिसरा स्वच्छता कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले. यात इको-प्रो जुनोना शाखेचे सदस्य सुध्दा सहभागी झाली होती.
सर्वप्रथम गावांतुन पक्षि विषयी जनजागृती रॅली काढण्यात आली यातुन पक्षि संरक्षणासाठी जनजागृती करण्यात आली. यानंतर सर्व विदयार्थी जुनोना तलावाच्या काठाने फिरत पक्षि निरीक्षण केले. यावेळी इको-प्रो चे पक्षिमित्र तथा पक्षि संवर्धन विभाग प्रमुख बंडु दुधे, उपप्रमुख हरिश मेश्राम, विकील शेंडे यांनी पक्ष्यांची माहीती व ओळख करून दिली. यादरम्यान विदयाथ्र्याना हरियल, राखी वटवटया, पिंगळा, कोकीळ, तांबट, शिंपी, महाभृगरांज, कोतवाल, बुलबुल, मैना, कवडी, पाणकावळा, वेडा राघु, खंडया, निलपंख, कुकु, पोपट, दयाळ, सातभाई, छोटा खाटिक, भुरा बगळा, गाय बगळा, आदी पक्षि पाहता आले.

*विदयार्थ्यांना पक्षि सप्ताह व पक्ष्यांचे निसर्गात महत्व यावर मार्गदर्शन*
यावेळी जुनोना तलाव काठावरील विदयाथ्र्याकरिता उपस्थित पक्षिमित्रांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षिमित्र बंडु दुधे, हरीश मेश्राम यांचेसह सावित्रीबाई फुले विदयालयाचे शिक्षक श्री विधाते सर, श्री राउत सर, श्री नागरकर सर यांनी मार्गदर्शन केले. पक्षिमित्र बंडु दुधे यांनी, पक्षि निसर्गात महत्वाचे असुन आपल्या सभेावताल पक्ष्यांचा उत्तम अधिवास असुन त्याचा योग्य अभ्यास करून प्रत्येक विदयाथ्र्याने संरक्षण व संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहीजे असे मत व्यक्त केले. श्री विधाते सर यांनी मारूती चितमपल्ली संराची शाळेत असतांना पाठयक्रमातील पक्षी बदद्ल माहीतीमुळे आम्हाला माहीती मिळत होती, आज अशा कार्यक्रमातुन इको-प्रोच्या माध्यमातुन आपणास माहीती मिळत असुन याबाबत अधिक विदयाथ्र्यानी जाणुन घेण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.

*जुनोना तलाव परिसराची स्वच्छता अभियान*
जुनोना तलाव जलमहल परिसरात होणाऱ्या पार्टी व भोजन कार्यक्रमामुळे सर्वत्र प्लास्टीकचे प्लेट, वाटया, ग्लास तसेच खादय पदार्थाचे वेष्टन यामुळे परिसरात मोठया प्रमाणात प्लास्टीकचा खच पडलेला होता. याठिकाणी प्लास्टीकचे प्रदुषण मोठया प्रमाणात झालेले लक्षात घेउनच ‘पक्षि निरिक्षण व परिसर स्वच्छता’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी स्वच्छता विषयाी विदयार्थ्याना मार्गदर्शन केले यावेळी इको-प्रो चे धमेंद्र लुनावत उपस्थित होते. इको-प्रो चे सदस्य व शालेय विदयार्थी यांनी संपुर्ण परिसरातील प्लास्टीकचे संकलन करून परिसराची स्वच्छता केली. यादरम्यान तलाव परिसरातुन पाच बोरी प्लास्टीक तर एक बोरी दारूच्या बाटला जमा करण्यात आले. इको-प्रो सदस्यांनी कार्यक्रमानंतर सर्व प्लास्टीक कचरा चंद्रपूर येथील महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन केंद्रावर जमा करण्यात आले.

इको-प्रो तर्फे आयोजित पक्षि निरीक्षण, जनजागृती रॅली व स्वच्छता कार्यक्रम यशस्वी करण्यास इको-प्रो जुनोना शाखेचे सुभाष टिकेदार, प्रशांत मांढरे, प्रदिप मोहुर्ले, आकाश कोेंडावार, स्वप्नील इटकलवार, इको-प्रो पक्षि संवर्धन विभागाचे वैभव मडावी, अमोल उटटलवार, महेश होकर्णे, सागर कावळे, प्रतिक मुरकुटे, सुरज कावळे, राॅजर रंगारी, आशिष मस्के, सुमित कोहळे, अतुल रांखुडे आदीनी सहकार्य केले.