सुनेनेच तोडले तिनही दुकानाचे कुलप सासऱ्यांचा आरोप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ नोव्हेंबर २०१९

सुनेनेच तोडले तिनही दुकानाचे कुलप सासऱ्यांचा आरोप


वाडीत पत्रपरिषद मध्ये सासऱ्यांनी दिली माहिती
नागपूर / अरूण कराळे:
वाडीचे ज्वेलर्स व्यापारी सूरेश गुरव यांचा मुलगा संदीप गुरवचा १२ ऑगस्ट २०१७ रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. संदीपच्या मृत्युनंतर आजपर्यंत पारिवारिक प्रकरण शांत झाले नाही.सून अश्विनी संदीप गुरुव यांनी वाडी पोलिसात सासरे सुरेश गुरुव यांच्याविरूद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याची माहिती सुरेश गुरव यांनी वाडी येथे पत्रपरिषदमध्ये दिली.

दत्तवाडी येथे पुष्पालता ज्वेलर्स हे गुरव कुटुंबातील ज्वेलर्सचे दुकान आहे. संदीपच्या मृत्युनंतर चार दूकाने बंद पडले आहे.ज्यात दूकान क्रमांक १ व २ पवन गुरव यांचा नावावर आहे तसेच दूकान क्रमांक ३ व ४ संदीपच्या नावावर आहे. ६ ऑगस्ट २०१९ रोजी संदीपची पत्नी अश्विनी गूरव यांनी काही महिलांना सोबत घेवून बंद असलेल्या तीन दूकानाचे कुलूप तोडले व तिथे कपडयाचे दूकान सूरु केले . 

सासऱ्याच्या घरावर व दिराच्या दुकानावर सून अश्विनीने ताबा घेतल्यामुळे सासरे सुरेश गुरव यांनी वाडी पोलिसात तक्रार दिली परंतू वाडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांनी दुकान तोडणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल न करता उलट माझ्यावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप सुरेश गुरव यांनी केला . 

याविरोधात सूरेश गुरव यांनी पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त,डीसीपी, एसीपी व मुख्यमंत्रीकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. सूरेश गुरवनी पत्रपरिषद मध्ये सांगितले की जे दुकान संदीपच्या नावावर आहे तेच घ्यायचे होते .

परंतु पवनच्या दुकानाचे कूलूप का तोडले? तिला काय अधिकार होता दुसऱ्याच्या दुकानाचे कुलूप तोडणे हा काय गुन्हा नाही का?मग पोलिसांनी त्यावर कारवाई का केली नाही ? दुकानात काही सोनं-चांदीसुद्धा ठेवण्यात आले होते .

ते सूद्धा पोलिसांकडून तपास केला गेला नाही.पोलिसांनी या प्रकरणाची योग्य अंमलबजावणी केली नाही हे प्रकरण दिनेश तांदुळकर यांनी दडपवले आहे.प्रकरणात अजामीनपात्र अधिकारी असल्याची धमकी पोलिसांकडून देण्यात आली होती.पोलिसांच्या या कृत्याने सुरेश गुरव नाराज आहेत. 

वाडी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली नसली तरी गुरव यांच्यावर हा खटला ठेवण्यात आला होता.आता हे प्रकरण न्यायालयात जाणार असल्याची माहिती सूरेश गूरव यांनी दिली.
संदीप गुरवच्या सूसार्डड नोटचे
 रहस्य गूलदस्त्यात?
संदीप गुरव यांचा मृत्यू हदयविकाराने झाला असल्याची खात्री पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये आहे. परंतु मृत्युपूर्वी संदीपने ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सुसाईड नोट लिहीली त्यामध्ये काही लोकांचे नावे लिहिले आहे . आजपर्यंत दोन वर्षे होऊन सुद्धा त्या सुसाईड नोटची काहीच चौकशी केली गेली नाही.हे पत्र संदीप यांनी स्वत: च्या स्वाक्षरीने लिहिले होते त्याबद्दल हस्तलेखन तज्ञाने याची पुष्टी केली आहे. तरीही पोलिसांनी या सुसाड नोटची चौकशी केली नाही . 

सुसाईट नोटच्या आधारे पोलिसांनी योग्य दिशेचा तपास केला तर सुसाईड नोटचे खरे रहस्य समोर येईल.परंतु पोलिसांनी हे सुसाईड नोट उघडले नाही कारण या पत्रात एपीआयचे नाव देखिल लिहिले गेले आहे . या प्रकरणात वरिष्ठ पोलिसांनी योग्य ते तपास करुन आणि दोषी अश्विनी गुरव व पोलिस अधिकारी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी सुरेश गुरव यांनी केली आहे .

सदर प्रकरणाचा तपास मी करीत नाही वरिष्ठ पोलिस निरीक्षक करतात.मि त्यांना तक्रार घेण्यास सांगितले होते.मात्र त्यांनी तक्रार घेतली नसेल तर त्यांच्या विरुद्ध वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे कड़े तक्रार केली पाहिजे.
सिद्धांत शिंदे,एसीपी एमआईडीसी विभाग नागपुर