‘घेऊन जा गे मारबत’ गिताच्या ‘बकाल’ चित्रपटाचे शुक्रवारी प्रदर्शन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ नोव्हेंबर २०१९

‘घेऊन जा गे मारबत’ गिताच्या ‘बकाल’ चित्रपटाचे शुक्रवारी प्रदर्शन


नागपूर/प्रतिनिधी:
बहुप्रतिक्षित ‘बकाल’ हा मराठी चित्रपट येत्या 8 नोव्हेंबर (शुक्रवार) पासूनराज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. नागपुरातील 140 वर्षापासूनची परंपरा असलेल्या ऐतिहासिक ‘मारबत’ ची महती सांगणारे नागपूर येथील सुरेंद्र मसराम यांची शब्दरचना आणि मोरेश्वर निस्ताने यांनी संगितबद्ध केलेले ‘घेऊन जा गे मारबत’ गित हे या चित्रपटाचे विशेष आकर्षण आहे. प्रसिद्ध दिग्दर्शन समिर आठल्ये यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘बकाल’ ची निर्मिती राजकुमार मेंढा यांची असून प्रसिद्ध तारका अलका कुबल यांची या चित्रपटात प्रमुख भुमिका आहे. आदर्श शिंदे आणि धनश्री देशपांडे यांनीस्वरबद्ध केलेल्या ‘मारबत’ वरील गाणे या गिताचे लोकार्पण मारबत महोत्सवाचेवेळी बकाल चित्रपटाच्या संपुर्ण कलावंतांच्या उपस्थितीत नागपुरात झाले होते. हे गित यापुर्वीच सर्वत्र लोकप्रिय झाले असून यु ट्यूब वर तर या गिताने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 

नागपुरातील लक्ष्मी, अलंकार, के सेरा सेरा, पीव्हीआर, सिनेमॅक्स, कार्निव्हल आणि आय नॉक्स यासह विदर्भातील अनेक चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित बोत असून विदर्भातील तमाम चित्रपट रसिकांनी हा चित्रपट आवर्जून बघावा, असे आवाहन गितकार सुरेंद्र मसराम यांनी केले आहे. 

सुरेंद्र मसराम
कवी व गितकार