मानकापूर येथे महावितरणचे शाखा कार्यालय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ नोव्हेंबर २०१९

मानकापूर येथे महावितरणचे शाखा कार्यालय

नागपूर/प्रतिनिधी:

मानगापूर, झिंगाबाई टाकळी, आर्यनगर, गोधनी नाका, ताजनगर या भागातील वीज ग्राहकांसाठी महावितरणने मानकापूर येथे नवीन शाखा कार्यालय सुरु केले आहे. मानकापूर येथील 132 केव्ही उपकेंद्राच्या आवारात सुरु करण्यात आलेल्या या शाखा कार्यालयाचे उद्घाटन नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

महावितरणने वितरण फ़्रेन्चाईझीचे काम हाती घेतल्यानंतर या भागातील ग्राहकांना त्यांच्याकार्यालयीन कामामरिता अथवा तक्रारींसाठी काटोल रोड चौकातील शाखा कार्यालयात यावे लागायचे, ग्राहकांची ही अडचण लक्षात घेता महावितरणने मानकापूर येथे नवीन शाखा कार्यालय सुरु केल्याने आता मानकापूर आणि काटोल रोड चौक अशी दोन स्वतंत्र शाखा कार्यालये झाली आहेत. या शाखा कार्यालयामुळे परिसरातील हजारो वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या शाखा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सिव्हील लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीधर सोरते व अजय कोलते, उपकार्यकारी अभियंता निशा चौधरी यांचेसह अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.