गरीब रुग्णांसाठी आमदार समीर मेघे ठरले देवदूत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ नोव्हेंबर २०१९

गरीब रुग्णांसाठी आमदार समीर मेघे ठरले देवदूत

प्रतिनिधी/अनिल पवार :
चांपा:
पैशाअभावी अनेक रूग्णांना जीव गमवावा लागतो. गरज पडल्यास सोयरेही धावून येत नाहीत मात्र एक लोकप्रतिनिधी म्हणून हिंगण्याचे आमदार समीर मेघे हे गोरगरीब गरजू रूग्णासाठी देवदूत बनले आहेत.

हिंगणा व नागपुर ग्रामिण मध्ये दुर्धर आजारग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपचे आमदार समीर मेघे गेल्या सहा-सात वर्षांपासून हिंगणा विधानसभा नव्हे तर उमरेड विधानसभेतील आजारग्रस्त व अपघातग्रस्तांना तत्काळ मदतीचा हात देऊन अनेक गरीब रुग्णांसाठी आमदार समीर मेघे देवदूत ठरले आहेत. 

चांपा येथील विलास ठाकरे वय 32 रा .चांपा ता उमरेड येथील रहिवासी असून गेल्या दोन महिन्यापासून दुर्धर पायाच्या आजारग्रस्त असलेले विलास ठाकरे यांना बाहेरगावी उपचार,व राहण्याचा खर्च झेपत नसल्याने विलास यांची आर्थिक कोंडी होत असल्याने विलास दोन महिन्यापासून घरातच होता .

कृष्णा इरपाते या युवकांने सरपंच अतिश पवार यांना विलास यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती दिली .सरपंच अतिश पवार यांनी विलासला घरी जाऊन भेट घेतली व विलासच्या पायाला गंभीर आजारपण आल्याचे निदर्शनास आले .सरपंच अतिश पवार यांनी गावातील युवकांना मदत करण्याचे आवाहन केले असता गावातून दहा हजार लोकवर्गणी गोळा करून तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले . 

डॉक्टरांनी विलासच्या पायाचे तत्काळ ऑपरेशन करण्यास सांगितले व अंदाजे खर्च सत्तर हजार च्या जवळजवळ येणार असल्याचे सांगितले , ताबडतोब तीस हजार ॲडव्हान्स्ड मध्ये भरण्यास सांगितले , अन्यथा ऑपरेशन तत्काळ न केल्यास विलासचा पाय कापावा लागेल असे सांगितले .

सरपंच अतिश पवार यांनी उमरेडचे नवनिर्वाचित आमदार राजु पारवे यांना संपर्क साधला असता आमदारांनी वेळ नसल्याचे सांगितले , अनेक सामाजिक संघटनाशी संपर्क साधला असता रेड स्वस्तिक सोसायटी संघटना तर्फे पाच हजार रुपयांचे मदत करण्याचे आश्वासन दिले , परंतु सत्तर हजार जमवाजमव करणे शक्य नसल्यामुळे नागपुर येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. 

नागपुर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याकरिता विलासला दिवसभर या वार्डातुन त्या वार्डात या रुग्णांची गैरसोय झाली व हताश होवून विलास घरी परतले , सरपंच अतिश पवार यांनी हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांना विलासच्या पायाच्या आजारपणाची माहिती दिली असता आमदार समीर मेघे यांनी विलासला रुग्णालयाकरिता आर्थिक मदतीचा हात देत तत्काळ विलासला वर्धा सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला असता चांपा गावांतील युवकांनी दहा हजार रुपये गोळा करून विलासला तत्काळ वर्धा सावंगी मेघे येथील रुग्णालयात आणले , असता आमदार समीर मेघे यांनी आचार्य विनोबा भावे या रुग्णालयात स्वता डॉक्टरांशी संपर्क साधला, व 

वार्ड क्र 42मध्ये विलास यांच्या पायाच्या आजारावर तत्काळ उपचार सुरू केले आहेत .अशी सुचना चांपा गावांतील युवकांना माहिती मिळताच 

विलास ठाकरे यांच्या पायाच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचा हात दिल्याबद्दल आमदार समीर मेघे यांचे चांपाचे सरपंच अतिश पवार व विलास कुटुंबीय सहित सर्व चांपा वासियांनी आमदार समीर मेघे यांचे आभार मानले असून चांपा गावात सर्वत्र कौतुकाचे वर्षाव होत आहेत .