ताडोबातील हत्तीने राखणदाराला चिरडले;राखणदार जागीच ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ नोव्हेंबर २०१९

ताडोबातील हत्तीने राखणदाराला चिरडले;राखणदार जागीच ठार

ललित लांजेवार/चंद्रपुर:
वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर शनिवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एक दुःखद घटना घडली,ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी आणण्यात आलेला हत्ती नियंत्रणाबाहेर जाऊन देखरेख करणाऱ्या माहूत जानकीराम मसराम याला जागीच चिरडून ठार केले.

व्याघ्र दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना हत्ती सफारीचा आनंद घेण्यासाठी वनविभागाने मोहूर्ली येथील मुख्य प्रवेशद्वारावर हत्ती सफारी सुरू केली होती, यात हा गणेश नावाचा हत्ती होता.

मिळालेल्या माहितीवरून 1 नर 2 मादा असे 3 हत्ती मोहूर्लीच्या मुख्य प्रवेशद्वार ठेवण्यात आलेले आहे हे पर्यटकांना सफारी घडवून आणतात, मृतक माहूत जानकीराम मसराम हा या हत्तींची देखरेख व चारापाणी करतो, अशातच गणेश हत्ती हा हिटवर(प्रजनन करण्याचा तयारीत) असल्याने अगोदरच प्रेग्नेंट असलेल्या मादी हत्तीने त्याला जवळ येऊ दिले नाही,व तो त्याच्या प्रजनन क्षमतेला तो थांबवू शकला नाही, यामुळे हत्ती चवताळला व नियमित चारापाणी करणाऱ्या माहूत जानकीराम मसराम वर हल्ला करत ठार केले,


ही घटना ताडोबाचं प्रवेशद्वार असलेल्या मोहर्ली गेटवर घडली. या घटनेमुळं वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव बदलला मार्ग
तर दुपारच्या सफारीवर जाणाऱ्या सर्व पर्यटकांना भनक न लागता वनविभागाने सर्व जिप्सी व कॅण्टर गाड्या या खुटवंडा गेटवरून वळवल्या त्यामुळे पर्यटकांना देखील विचार करावा लागला की नियमित मोहूर्ली गेट वरून येणाऱ्या गाड्या आज खुटवंडा गेटवरून कशा काय परत येत आहे? या कारणामुळे सर्व पर्यटक चिंतेत होते. मात्र परत मुरली गेटवर सर्व गाड्या येताच हा प्रकार सर्व पर्यटकांना माहित झाला.

या घटनेनंतर संपूर्ण मोहूर्ली गावात दहशतीचे तसेच दुःखाचे वातावरण निर्माण झालेले आहे.