चंद्रपुर:नदी पात्रातील दगडांमध्ये अडकला पट्टेदार वाघ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ नोव्हेंबर २०१९

चंद्रपुर:नदी पात्रातील दगडांमध्ये अडकला पट्टेदार वाघ

नागपूर/ललित लांजेवार:
वाघांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघा बद्दल एक चिंताजनक बातमी आहे,

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील माजरी गावाजवळील शिवना नदीच्या पात्रात २ दगडांमध्ये पट्टेदार वाघ फसलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली.
नदीपात्रातील पुलावरून जाणाऱ्या गावकऱ्यांना वाघ अडकून असल्याची माहिती मिळाली व घटनास्थळावर एकच गर्दी झाली वाघ अडकून पडण्याची माहिती गावकऱ्यांना होताच वनविभागाला याची माहिती देण्यात आली व त्यानंतर त्या वाघाला वाचवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न सुरू झालेत


प्राथमिक अंदाज घेतला असता वाघ उडी मारत रस्ता काढत असतांना मुलायम दगडांवरून त्याचा पाय घरसला व तो जखमी होत दोन दगडांमध्ये फसला,तर शिकार करण्यासाठी देखील वाघाने शिकारीचा पाठलाग केला असू शकतो व त्यात तो पाठलाग करताना जखमी झाला असावा अशी देखील शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.

हा वाघ जखमी अवस्थेत अजूनही जिवंत असून, त्याला वाचविण्यासाठी वनविभागाचा चमू घटनास्थळी दाखल झाला आहे.