चंद्रपूर पोस्ट ऑफिस पासपोर्ट सुविधा केंद्रास हंसराज अहीर यांची भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ नोव्हेंबर २०१९

चंद्रपूर पोस्ट ऑफिस पासपोर्ट सुविधा केंद्रास हंसराज अहीर यांची भेटचंद्रपूर पासपोर्ट सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना मिळत असलेल्या सुविधा व प्रणालीचा हंसराज अहीर यांनी घेतला आढावा

चंद्रपूर-  येथे सुरु असलेल्या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सुविधा केंद्रास आज पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट दिली. या पासपोर्ट सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना पासपोर्ट तयार करण्यासाठी मिळत असलेल्या सुविधांचा व प्रणालीचा एकूण आढावा यावेळी हंसराज अहीर यांनी घेतला. तत्कालीन परराष्ट्रमंत्री स्व. सुषमा स्वराज जी यांच्या सहकार्याने सुरु केलेल्या या पासपोर्ट सुविधा केंद्रातून चंद्रपूर जिल्ह्यातील दरदिवशी सरासरी ४० नागरिक या सुविधेचा लाभ घेत आहेत. हे सुविधा केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे. त्यातच विदेशवारी करण्यासाठी असलेल्या सर्व नागरिकांसाठी पासपोर्ट ची सुविधा आज जिल्हा केंद्र स्थानी आपण करू शकलो याच सुद्धा यावेळी हंसराज अहीर यांनी समाधान व्यक्त केले.


२ अटॅचमेंट