चित्ररथाद्वारे शेतीच्या योजनांची प्रसिद्धी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ नोव्हेंबर २०१९

चित्ररथाद्वारे शेतीच्या योजनांची प्रसिद्धी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद


शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद
चंद्रपूर, 28 नोव्हेंबर: राज्य शासन व केंद्र शासनाच्या योजनांची जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये तब्बल 15 चित्ररथ गावागावांमध्ये फिरुन व्हिडिओद्वारे तसेच फलकाद्वारे माहिती प्रसारित करत असून शेतकऱ्यांपर्यंत योजनांची पत्रके वितरित करण्यात येत आहे. या अभियानाला जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी संपर्क साधून योजनेच्या लाभासाठी नोंदणी अर्ज सादर करणे सुरु केले आहे. सोबत विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केले जात आहे.
            योजना शेतकऱ्यांच्या दारी या अभियानाला 26 नोव्हेंबर 2019 पासून सुरुवात झाली असून चित्ररथाचे अनावरण प्रत्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शेतकरी विकासाच्या संपूर्ण योजना शेताच्या बांधापर्यंत पोहोचवाअसे निर्देश प्रशासनाला दिले होते. शासनाच्या विविध योजनांचे स्वरूप शेतकऱ्यांना सहजरीत्या समजावे याकरिता पथनाट्याच्या माध्यमातून सर्व योजनांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. यासंदर्भातील बैठक नुकतीच जिल्हा माहिती कार्यालयात पार पडली आहे. अशा विविध योजनांमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनाप्रधानमंत्री पिक विमा योजनामागेल त्याला शेततळे योजनाडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनाबिरसा मुंडा सिंचन क्रांती योजनापशुसंवर्धन विभागाच्या योजना अशा विविध योजनांचा यात समावेश आहे. या योजनांची माहिती व्हिडिओद्वारे तसेच पत्रकाद्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी पोहोचावी. याकरिता 15 चित्रात प्रत्येक गावागावात पोहोचत असून आठवडी बाजारात प्रसिद्धी करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या या प्रसिद्ध अभियानाला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभत असून पहिल्या दिवशी अनेक शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर केले आहे.

शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनाप्रधानमंत्री पिक विमा योजनामागेल त्याला शेततळेशेडनेट योजना या योजनांचा यात समावेश असून लाभ घेण्यासाठी ग्रामस्तरावर कृषी सहायक ,तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावातसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनाबिरसा मुंडा सिंचन क्रांती योजनापशुसंवर्धन विभागाच्या योजना अशा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुकास्तरावरील पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकाऱ्यांशी तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्याशी संपर्क करावा. तसेच डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट आपले सरकार डॉट कॉम या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.