वर्धा;दुचाकींचा अपघात १ ठार १ जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ ऑक्टोबर २०१९

वर्धा;दुचाकींचा अपघात १ ठार १ जखमीउमेश तिवारी/कारंजा (घाडगे)
आज२९/१०/२०१९ सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान ठाणेगाव वरून काटोल ला जात असताना वळनावर बोरी फाटा शिवारात दुचाकीचा अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला दुसऱ्याला ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे भरती करण्यात आले.


   सविस्तर महिती नुसार राहुल सुधाकर कीनेकर (२६) रा. धामणगाव ता. काटोल व त्याचा आतेभाऊ गौरव नरेंद्र फरकाड़े (२५) रा. ठाणेगाव , ठाणेगाव वरून काटोल ला जात असताना दुचाकी क्र. MH40W6228 रस्त्यावरुन स्लिप झाल्याने राहुल कीनेकर चा जागेवर मृत्यू झाला. तर गौरव फरकड़े गंभीर जखमी झाला. जखमी गौरवला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारा नंतर नागपूर येथे पाठविण्यात आले.