ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजय वडेट्टीवार विजयी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ ऑक्टोबर २०१९

ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजय वडेट्टीवार विजयी


चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार 18 हजार 549 मताधिक्याने विजयी झाले आहेत.

ब्रह्मपुरी मतदारसंघातून 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बहुजन समाज पार्टी कडून मुकुंदा मेश्राम यांना 1925 मते, इंडियन नॅशनल काँग्रेस कडून विजय वडेट्टीवार यांना 96726 मते, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून विनोद झोडगे 1993, शिवसेना पक्षाकडून संदीप गड्डमवार यांना 78177, बहुजन वंचित आघाडी कडून चंद्रलाल मेश्राम यांना 7608, आम आदमी पार्टीकडून पारोमिता गोस्वामी यांना 3596, संभाजी ब्रिगेड पार्टीकडून जगदीश पीलारे 962 मते, अपक्ष म्हणून प्रणव सोमनकर 282 मते , विश्वनाथ श्रीरामे 479 तर अजय पांडव 359, विनय बांबोडे यांना 262 मते तर नोटाला 1099 एवढी मते मिळाली.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सायंकाळी हा निकाल जाहीर केला.