वर्धा:तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ ऑक्टोबर २०१९

वर्धा:तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे)

गवंडी येथील तरुण शेतकरी उमेश दौलतराव धोटे वय ३४ वर्षे या शेतकऱ्याने आज दि. १७/१०/२०१९ ला दुपारी २ वाजताच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मृतक शेतकरीवर बँक चे अंदाजे ३ लाख रु कर्ज होते असे समजते. मृतकाच्या नावावर ९ ते १० एकर शेती आहे. आत्महत्या केली त्यावेळी घरी कोणीही नव्हते पत्नी लहान मुलाला घेऊन कारंजा येथे दवाखान्यात आली होती. तर म्हातारे आई आणि वडील शेतात गेले होते. 

मृतकाच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या हेमराज आटनेकर हे मृतकाच्या घरी शेती उपयोगी साहित्य मागण्या करीता गेले असता त्यांना मृतक उमेश धोटे फासावर लटकलेला दिसला. त्या बद्दल ची माहिती गवंडी येथील पुलिस पाटील पंकज धारपुरे यांना दिली असता घटनेची माहिती पोलीस ठाणे कारंजा यांना दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश साहेर करीत आहे.