इंदिरा गांधी आणि वल्लभभाई पटेल यांना महावितरणचे अभिवादन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ ऑक्टोबर २०१९

इंदिरा गांधी आणि वल्लभभाई पटेल यांना महावितरणचे अभिवादन

नागपूर/प्रतिनिधी:
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त या दोन्ही महान विभुतींच्या प्रतिमेस महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी, राष्ट्रीय एकता दिवसाची सामुहीक शपथ घेण्यात आली. 

महावितरणच्या विद्युत भवन, येथे आयोजित या कार्यक्रमाला म्हाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंते सर्वश्री उमेश शहारे, नारायण आमझरे, अनिल घोगरे. 

सतिश अणे (महापारेषण), उपमहाव्यस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, कार्यकारी अभियंता दिपाली माडेलवार, मंजूषा आडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे यांचेसह अधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.