आनंदाची बातमी;दिवाळी निमित्य चंद्रपूर-पुणे विशेष रेल्वेगाडी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ ऑक्टोबर २०१९

आनंदाची बातमी;दिवाळी निमित्य चंद्रपूर-पुणे विशेष रेल्वेगाडी


चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर व नजिकच्या जिल्हयातील अनेक विद्यार्थी व परिवार हे पुणे येथे असतांना दिवाळी सारख्या सणांमध्ये त्यांना गृह जिल्हयात येण्यासाठी अनेक अडचणी येत असतात. दिवाळी करिता स्पेशल रेल्वे जिल्हयातील विद्याथ्यांना उपलब्ध व्हावी या अनुशंगाने चंद्रपूर रेल सुविधा संघर्श समितीच्या वतिने पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना मागणी करण्यात आली असतांना या मागणीची पुर्तता म्हणून दि. 25 आॅक्टो. 2019 रोजी पुणे येथून बल्लारशाह करिता स्पेशल सुविधा ट्रेन उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती चंद्रपूर रेल सुविधा संघर्श समिती च्या वतिने देण्यात आली आहे. 

दिवाळी सारख्या सणामध्ये प्रत्येकांना आपल्या घरी दिवाळी साजरी करायची असल्याने या सर्वांची सुविधा व्हावी या संकल्पनेतून हि सुविधा रेल्वे पुणे ते बल्लारशा साठी येणार आहे. चंद्रपूर जिल्हयातील विद्याथ्र्यांना व परिवारांना पुणे करिता काझीपेठ - बल्लारशा - चंद्रपूर - पुणे ही रेल्वे असतांना ही पुरे नसल्याने एक नविन स्पेशल सुविधा एक्सप्रेस दिवाळीत सुरू व्हावी हा उद्देश घेत समितीच्या वतिने हंसराज अहीर यांना विनंती करण्यात आली असल्याचे समितीने सांगीतले. 
असा असेल वेळापत्रक 
सदर स्पेशल सुविधा ट्रेन क्र. 82123 /01458 ही पुणे येथून 25 आॅक्टो. ला रात्री 11.55 मिनीटांनी सुटणार असून दि. 26 आॅक्टो. रोजी सायं. 4.30 मिनीटांनी वरोरा, सायं 5.20 मिनीटांनी चंद्रपूर तर सायं 06.10 मिनीटांनी बल्लारषा येथे पोहचणार आहे. त्याच दिवषी म्हणजे 26 आॅक्टो. रोजी रात्री 9.00 वाजता सदर ट्रेन पुण्याला रवाना होईल व रात्री 9.15 मिनीटांनी चंद्रपूर, रात्री 9.45 मिनीटांनी वरोरा येथे पोहचेल व लगेच पुढील प्रवासासाठी रवाना होईल. 

या स्पेशल सुविधाचे थांबे पुढील प्रमाणे असणार आहेत. पुणे, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगांव, मनमांड, भुसावळ, षेगांव, अकोला, बडनेरा, धामनगांव, पुलगांव, वर्धा, वरोरा, चंद्रपूर व बल्लारपूर. सदर स्पेषल रेल्वे सुविधेचा लाभ विद्याथ्र्यांनी व कुटूंबानी घ्यावा असे आवाहन करण्यात आले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री पियुश गोयल, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, रेल्वे बोर्ड अधिकारी व अन्य अधिका-यांचे चंद्रपूर रेल सुविधा संघर्श समितीचे सर्वश्री दामोदर मंत्री, रमणीकभाई चव्हाण, रमाकांत देवडा,मधुसूदन रूंगटा, प्रभाकर मंत्री, दिनेष बजाज, डाॅ. भुपेष भलमे, डाॅ. सुषील मुंधडा, अनिश दिक्षीत, रमेष बोथरा, अषोक रोहरा, राजेष सादराणी, नरेंद्र सोनी, पुनम तिवारी यांनी आभार व्यक्त केले आहे. 
काझीपेठ - बल्लारशा - चंद्रपूर - पुणे एक्सप्रेस मध्ये 2 डब्यांची विषेश वाढ 
सणासुदीच्या दिवसांमध्ये काझीपेठ - बल्लारषा - चंद्रपूर - पुणे एक्सप्रेस या रेल्वेमध्ये प्रवाषांची संख्या अधिक असतांना या एक्सप्रेस च्या डब्यांमध्ये वाढ करण्यासाठी समितीच्या वतिने पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना विनंती करण्यात आली होती. या पाष्र्वभुमीवर या एक्सप्रेसमघ्ये दि. 25 आॅक्टों. 2019 पासून 2 डब्यांची वाढ करण्यात येणार आहे अशी माहिती चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीच्या वतिने देण्यात आली आहे.