EVM मशीनवर उमेदवाराच्या नावाचे बटन पुसट दिसत असल्याने किशोर जोरगेवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ ऑक्टोबर २०१९

EVM मशीनवर उमेदवाराच्या नावाचे बटन पुसट दिसत असल्याने किशोर जोरगेवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

माझ्या चिन्हासमोरील बटन जानीवपूर्ण अदृश्य केली

किशोर जोरगेवार यांचा आरोप, जिल्हाधिका-यांकडे तक्रार

चंद्रपुर/प्रतिनिधी:
सकाळी आठ वाजता पासून महाराष्ट्रासह चंद्रपूरातही मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र अणेक बुथवर अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या नवासमोरिल बटन फुसट झाल्याच्या तक्रारी सुरु झाल्या आहे. अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांचे चिन्ह असलेल्या नवासमोर षडयंत्र सचुन पूर्णनपे ही बटन अदृश्य करण्यात आली असल्याचा आरोप किशोर जोरगेवार यांनी केला असून याबाबतची तक्रार त्यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पासूनच ही निवडणूक किशोर जोरगेवार यांच्यासाठी अडचणीची ठरली आहे. 

या प्रकारांनंतर आता सर्वत्र खळबळ उडाली असून मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांमध्ये चांगलीच अडचण होत आहे. 

विशेष म्हणजे उमेदवाराच्या नावासमोर त्याच्या चिन्हांची झेरॉक्स प्रिंट लावल्या जाते ही प्रिंट पुसट आल्याने हा संपूर्ण प्रकार घडला, अशा विविध नावांवर देखील पुसद प्रिंट आल्याची माहिती आहे

अश्या तक्रारी प्राप्त होताच किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली आहे. शासकीय यंत्रणेला हाताशी धरल्या गेले आहे. या यंत्रनेच्या माध्यमातून मला नाहक त्रास देण्याचे काम केल्या जात आहे. असे व्यक्तव्य अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी केले.