चंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून

चंद्रपूर/प्रतिनिधी:
धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. अक्षय मून असे मृताचे नाव असून तो घुटकाळ्यातील अण्णाभाऊ साठे चौकातील रहिवासी आहे. 

शनिवारी अक्षय हा परिसरातील नेहरू शाळा चौक परिसरात एका पानठेल्यावर उभा असताना चार युवकांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.

या, घटनेनंतर घुटकाळा परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीच्या मागावर आहे.