चंद्रपुर:घुटकाळा चौकात झालेला खून प्रेम प्रकरणातुन;खुनातील आरोपींना चंद्रपुर पोलीसांनी केले जेरबंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ ऑक्टोबर २०१९

चंद्रपुर:घुटकाळा चौकात झालेला खून प्रेम प्रकरणातुन;खुनातील आरोपींना चंद्रपुर पोलीसांनी केले जेरबंद

चंद्रपुर/प्रतिनिधी:
दिनांक २६/१०/२०१९ रोजी फियादी महिला हिने दिलेल्या रिपोर्टवरून घटनेतील मृतक नामे अक्षम मुन याचे प्रेमसंबंध होते. यातील आरोपी साजन उर्फ बोदया हा अक्षयल्या प्रेयसीला तु माझा सोबत बोल असे वारंवार त्रास देत होता. 

ही बाब अक्षयच्या लक्ष्यात आल्याने अक्षय याने साजन यास विवारले की, नु माझा प्रेयसीला का त्रास देतो,या कारणावरून त्यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. या कारणावरून आरोपी यांने मनात राग धरून आपल्या मित्रासह अक्षय याचा घुटकाळा चौक परिसरात धारदार चाकुने वार करून त्याचा खुन केला. आणि घटनास्थळावरून पसार झाले. 

पोलीसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली आणि काही वेळातच यातील आरोपी नामे १) साजन उर्फ बोदया रंजीत डोंगरे वय १९ यास अटक केली. आणि २८/१०/२०१९ रोजी यातील दुसरा आरोपी नामे २) राजन उर्फ गुलशन डोंगरे वय २१ यास अटक करण्यात आली. पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अप क. ९०३/२०१९ कलम ३०२, ३४अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आणि अन्य आरोपीचा शोध पोलीस अधीक्षक श्री. डॉ. महेश्‍वर रेडडी यांचे मार्गदर्शनात चंद्रपुर शहर पोलीस करीत आहे.