चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान चे ८०० दिवस पूर्ण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ ऑक्टोबर २०१९

चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान चे ८०० दिवस पूर्ण

स्वच्छता हेरीटेज वॉक मार्गाची 
1 मार्च 2017 पासून नियमित श्रमदान
चंद्रपूर/प्रतिनिधी:
इको-प्रो संस्थेच्या वतीने सुरु असलेले ऐतिहासिक किल्ला "स्वच्छता सत्याग्रह" म्हणजे चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान ला आज प्रत्यक्ष श्रमदान केल्यास 800 दिवस पूर्ण झाले.


2 वर्ष आधी 1 मार्च 2017 ला ऐतिहासिक गोंड़कालीन किल्ला परकोटाची स्वच्छता अभियान इको-प्रो संस्थेच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून सुरुवात केली. जवळपास 11 कीमी लांब असलेल्या या किल्ल्याची भिंतीची दुरावस्था झालेली होती. सतत परिश्रम घेत किल्याचे स्वरूप बदलण्यात यश मिळाले. सरकार पातळीवर दखल घेत बरीच नवीन गोष्टीकरिता सकारात्मक पावले उचलली गेली आहेत.

सलग स्वच्छता अभियान मुळे अनेक वर्ष पूर्वी सारखी या किल्ल्याच्या भिंतिवर दगड, माती-गोटे, बांधकाम वेस्ट, मोठ-मोठी झाड़े, साप-विचू ची भीति नाही. संपूर्ण किल्ल्याची स्वच्छता करण्यात आल्यानंतर आता फक्त पावसाळ्यात येणारे किल्ल्याच्या दगडाच्या फटीतुन झाड़ी-झुडपे ची समस्या कायम आहे. 


पावसाळ्यानंतर किमान दोन-तीन महीने पुरातत्व विभाग ने आता मजूर लावून स्वच्छ राखल्यास चंद्रपूर नागरिक-पर्यटक यांना या किल्ल्यावर फिरने सहज होईल. याचाच विचार करून पावसाळ्यापूर्वी पर्यंत जवळपास 40 हप्ते पासून सुरु असलेले "किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक" परत सुरु व्हावे म्हणून या मार्गात बगड खिडकी ते अचलेश्वर गेट मधील झाड़ी-झड़ूपे काढण्यासाठी श्रमदान करण्यात येत आहे. यापूर्वी सतत च्या पावसामुळे अडीच महीने किल्ला स्वच्छता अभियान मधे खंड पडलेला होता, ते मागील पंधरा दिवस पासून परत सुरु करण्यात आले आहे.

आज श्रमदान चा 800 वा दिवस असल्याने संस्थेचे सर्वच सदस्य उत्साहाने सहभागी झाले होते. येत्या 3 नोव्हे पासून परत दर रविवार ला किल्ला पर्यटन सुरु करण्यास सर्वोतोपरि प्रयत्न सुरु आहेत. 


आज च्या श्रमदान प्रसंगी संस्थेचे बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात इको-प्रो पुरातत्व विभाग उपप्रमुख कपिल चौधरी, अनिल अडगुरवार, नितिन रामटेके, सचिन धोतरे, विनोद दुधनकर, संजय सब्बनवार, प्रमोद मालिक, धर्मेंद्र लुनावत, राजु काहिलकर, जयेश बैनलवार, सुमित कोहले, आशीष मस्के, हरीश मेश्राम, सौरभ शेटे, शंकर पोइनकर, सुजाता डोंगरे, मनीषा जैसवाल, गौरव वाघाडे, ओम वर्मा, मनीष गावंडे, प्रमोद देवांगन, सुनील पाटिल, सुनील मिलाल, चित्राक्ष धोतरे सहभागी झाले होते.