जोरगेवार यांना उमेदवारी द्या अन्यथा मी आत्मदहन करणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ ऑक्टोबर २०१९

जोरगेवार यांना उमेदवारी द्या अन्यथा मी आत्मदहन करणार


अमोल शेंडे यांचा आत्मदहनाचा इशारा
चंद्रपूर/प्रतिनिधी:

यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी परवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र आता काँग्रेसकडून त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येत नसल्याने किशोर जोरगेवार यांचे समर्थक सध्या नाराज झाले आहेत. या कार्यकर्त्यांमधील किशोर जोरगेवार यांचे कट्टर समर्थक अमोल शेंडे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे, जर काँग्रेसने उमेदवारी किशोर जोरगेवार यांना उमेदवारी दिली नाही तर मी आत्मदहन करेल असा इशारा दिला आहे.

 अमोल शेंडे यांनी आज हा निर्णय घेतला असून आम्ही हा निर्णय किशोरभाऊ यांच्या कामाच्या जोरावर घेतला आहे असे अमोल शेंडे यांचे मत आहे. किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरात अनेक महत्वाचे जनहितार्थ आंदोलन आणि मोर्चे काढले आता खरी पक्षाची गरज असतांना त्यांना उमेदवारी दिली जात नसल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. 

त्यामुळे किशोर जोरगेवार यांना उमेदवारी दिली नाही तर आम्ही देखील कठोर निर्णय घेवू असा इशारा समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.