श्रमिक एल्गारचे नवे अध्यक्षपदी राजेश्वर सहारे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० सप्टेंबर २०१९

श्रमिक एल्गारचे नवे अध्यक्षपदी राजेश्वर सहारे


मूल/प्रतिनिधी श्रमिक एल्गारचे नवे अध्यक्ष म्हणून राजेश्वर सहारे यांची निवड करण्यात आली. आज चितेगांव येथे संघटनेच्या केंद्रिय कमेटीची बैठक झाली. या बैठकीत पारोमिता गोस्वामी यांचा राजीनामा स्विकारण्यात येवून, श्री. सहारे यांची निवड करण्यात आली.

श्री. सहारे यांचे नांव संघटनेचे उपाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी सुचविले, तर केंद्रीय कमेटीचे सदस्य शशीकांत बतकमवार, अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी अनुमोदन दिले.

यावेळी ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्रात ॲङ पारोमिता गोस्वामी यांना सक्रिय पाठींबा देण्यांचा निर्णय घेण्यात आला, निवडणूकीतील अनामत रक्कम संघटनेच्या वतीने भरण्यात येईल असे नवनियुक्त अध्यक्ष राजेश्वर सहारे यांनी जाहीर केले.

ब्रम्हपुरी व्यतीरिक्त इतर विधानसभा क्षेत्रात संघटनेची भूमिका काय राहील याबाबत स्वतंत्र बैठकीत निर्णय यावेळी घेण्यात आला.  श्री. राजेश्वर सहारे हे श्रमिक एल्गारचे 2010 ते 2015 या कालावधीत अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते अध्यक्ष असतांनाच, चंद्रपूर जिल्हयात दारूबंदीचे आंदोलन यशस्वी झाले होते, हे येथे उल्लेखनीय.