पारोमिता गोस्वामी यांनी दिला श्रमिक एल्गारच्या अध्यक्षपदाचा राजीनामा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ सप्टेंबर २०१९

पारोमिता गोस्वामी यांनी दिला श्रमिक एल्गारच्या अध्यक्षपदाचा राजीनामाचंद्रपूर/प्रतिनिधी 
आदिवासी, असंघटित कामगार, शेतकरी, शेतमजूर आणि समाजाच्या विविध घटकातील पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष ॲडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

अॅङ. गोस्वामी मागील सहा वर्षांपासून अध्यक्ष पदावर कार्यरत असून, त्या ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने संघटनेच्या तरतुदीनुसार त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे श्रमिक एल्गारचे महासचिव घनश्याम मेश्राम यांनी सांगितले.
रिक्त झालेल्या या पदावर अध्यक्षपदाची नियुक्ती करण्यासाठी येत्या काही दिवसातच केंद्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन अध्यक्षपदाची घोषणा करण्यात येईल.

ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी श्रमिक एल्गार मागील वर्षभरापासून रणनीती आखत आहे. मागील महिन्यात ऑगस्ट क्रांती संपर्क अभियान राबवून गावागावात लोकांशी संपर्क साधून प्रचाराचा नारल फोङला. आता आचारसंहिता लागू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना एङ. पारोमिता गोस्वामी यांनी प्रचारसभा, गावभेटी, लोकसंवादावर भर दिला आहे. दरम्यान, निवङणूक रिंगणात उतरण्यासाठी श्रमिक एल्गार च्या घटनासंहितेनुसार गोस्वामी यांनी राजीनामा दिल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.