शेकडो गरजुंनी घेतला मोफत नेञ तपासणी,चष्मे व औषधि शिबिराचा लाभ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ सप्टेंबर २०१९

शेकडो गरजुंनी घेतला मोफत नेञ तपासणी,चष्मे व औषधि शिबिराचा लाभ  • मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे मोफत नेञ तपासणी,चष्मे व औषधि वाटप शिबीर 
  •  सुनिलभाऊ कातकडे यांचा स्तुत्य उपक्रम


वणी : परशुराम पोटे

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे आज रविवारला मोफत नेञ तपासणी,चष्मे व औषधि वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचा कुंभा परिसरातील शेकडो गरजु लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
स्व.महादेव केशवराव कातकडे यांचे स्म्रुती प्रित्यर्थ शिवसेना रुग्णसेवा केन्द्र वणी,मारेगाव व झरी द्वारा दि 9सप्टे. ला आयोजित मोफत नेञ तपासणी,चष्मे व औषधि वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात अलोणे आय क्लिनिक अँड सर्जिकल केअर सेंटर वणीचेडाँ.अनिकेत अलोणे,डाँ.समिर वैद्य,डाँ.अमोल पंडीत,डाँ.सुनिल ढोले यांचे सहकार्य लाभले.
या शिबीराचा मोठ्या संख्येत गरजु रुग्णांनी लाभ घेतला.
त्याची आरोग्य व नेत्र तपासणी करून मोफत चष्मा व औषधी वाटप करण्यात आली
यावेळी सुनिलभाऊ कातकडे अध्यक्ष इंदिरा सह.सुतगिरणी वणी तथा शिवसेना वणी विधानसभा संघटक,दिपक कोकास उपजिल्हा प्रमुख शिवसेना,संजय निखाडे,
विनोदभाऊ मोहितकर माजी जिल्हा प्रमुख, गजाननजी किन्हेकर,वसंताजी मोहितकर,सुधिर थेरे, डाँ.विलास बोबडे,दिलीप काकडे,सुरेश नेहारे,सचिन पचारे,बाळु चेडे,अनिल राऊत निखिल चव्हाण ,विशाल किन्हेकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते