हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ सप्टेंबर २०१९

हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार


ललित लांजेवार/नागपूर:
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात चंद्रपुरहुन नागपुरला जात असताना हा अपघातया अपघातातून अहिर थोडक्यात बचावले, मात्र सीआरपीएफच्या वाहनातील दोघांचा मृत्यू 

चंद्रपूर-नागपूर महामार्गाहून पुढे जाताना तांडळी पूल पार केला. त्यानंतर अहिर पुढे गेल्यावर मागच्या ताफ्यातील वाहनाची कंटेनरला धडक बसली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात ठार झालेल्यांत गाडीचा चालक विनोद विठ्ठल झाडे (३७) रा . चंद्रपूर व सीआरपीएफचा जवान फलजीभाई पटेल यांचा समावेश आहे.


चालक मनोज झाडे (चंद्रपूर), एएसआय विजयकुमार, फलजीभाई पटेल, एम.जी. साजिद, जयदीपकुमार, प्रकाश भाई आणि बनवारीलाल रेगट (सर्व सीआरपीएफ) असे सातजण त्या गाडीत होते.