संत मातोश्री सरूताई माउली पुण्यस्मरण सोहळा रविवारपासून - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ सप्टेंबर २०१९

संत मातोश्री सरूताई माउली पुण्यस्मरण सोहळा रविवारपासून
पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात  विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची उत्सुकता


 मायणी:-  ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)         'हृदयी आहे ताईंची छाया अन, मनी आहे भाव हरिनामाचा, या  उक्ती प्रमाणे संत मातोश्री सरूताई यांचे हजारो भक्त त्यांच्या गुरुवार १९ सप्टें रोजी होणाऱ्या सातव्या  पुण्यस्मरण सोहळ्यात त्यांच्यापुढे नतमस्तक व लीन होण्यासाठी एकत्र येत आहेत. या दिवशी पहाटे ४वाजून ३२मिनिटांनी माउली सरुताईंच्या फुलांची वेळ आहे . मातोश्री सरूताई यांच्या पालखी व रथसोहळा मा .सौ उर्मिला येळगावकर व दिलीपराव येळगावकर  यांच्या शुभहस्ते प्रारंभ होणार आहे .


           या सोहळ्यास रविवार  दि १५ सप्टें पासून सुरुवात होत असून या दिवसापासूनच  'सरूताई लीलाअमृत 'या ग्रंथाचे पारायण सुरु होत आहे, अशी माहिती संत सदगुरु सरूताई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव श्री रवींद्र बाबर यांनी दिली.


          ट्रस्ट तर्फे वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते यावर्षीही या सोहळ्यात रविवार दि १५ रोजी ' सकाळी ९ ते ११.४५ गणेशपूजन, ग्रंथ,विणा, व्यासपीठ, प्रतिमा, ध्वज यांचे पूजन करून,ग्रंथवाचन व नामस्मरणास सुरुवात होणार आहे . दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत माउली महिला भजनी मंडळ निमसोड यांचे भजन यांचे  भजन ,४ ते ६ यावेळी  मा.श्री इंद्रजित देशमुख यांचे प्रबोधनपर प्रवचन  ,रात्री ९ ते ११ ह भ प जयंत जवंजाळ महाराज निमसोड  यांचे कीर्तन व  रात्री ११ते पहाटे ४ वैष्णव भजनी मंडळ निमसोड व चितळी यांचे  कार्यक्रम होणार आहेत  .


           सोमवार  दि १६ रोजी  दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत महालक्ष्मी महिला  भजनी मंडळ मायणी यांचे भजन  ,४ते ६ वाजेपर्यंत भावगीते व भक्तिगीते गायनाचा कार्यक्रम   ,"रात्री ९ ते  ११ पर्यंत विशेष असा हं भ प कु प्रियांका कदम विसापूर यांचे कीर्तन होणार आहे ." ,रात्री ११ते पहाटे४ वेजेगाव येथील माउली भजनी मंडळाचा जागरणाचा कार्यक्रम होणार आहे .


मंगळवार दि १७ रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथवाचन व नामस्मरण ,दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत चौंडेश्वरी महिला भजनी मंडळ कुंडल यांचे भजन तर  दुपारी ४ते ६ वाजेपर्यंत ह भ प चंदाताई तावडे पंढरपूर यांचे भारूड   ,रात्री ०९ ते ११  ह.भ.प. संजय कदम पाटण यांचे  कीर्तन होणार असून रात्री ११ ते ४ पर्यंत श्री संत शेकुबा दादा भजनी मंडळ पडळ याचे जागर होणार आहे . 


  बुधवार दि १८ सप्टें रोजी सकाळी ९ ते ११ पर्यंत ग्रंथवाचन,नामस्मरण होणार असून दुपारी १ ते ४ पर्यंत चौडेश्वरी भजनी मंडळ यांचे भजन व दुपारी ४ ते ६ ओंकार कल्चरल ग्रुप विटा क्यांचे मंगळागौरीचा कार्यक्रम ,तर रात्री ९ ते ११ ह.भ.प. दादा महाराज  तुळसणकर यांचे कीर्तन व रात्री ११ ते ४ सिद्धनाथ भजनी मंडळ सांगोले यांचा जागरणाचा कार्यक्रम , या सारखे कार्यक्रम या चार दिवसांच्या या सोहळ्यात पार पडणार आहेत. 


            तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे ,व आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत सद्गुरु मातोश्री सरुताई माउली चॅरिटेबल ट्रस्ट  तर्फे करण्यात आले आहे. 


चौकट :-  या सोहळ्याच्या दि १५ ते १८  सप्टे रोजी मातोश्री 'सरूताई लीलाअमृत ग्रंथाचे पारायण दररोज नऊ ते बारा या वेळेत होणार असून वाचकांनी लवकरच नावनोंदणी करावी. परगावच्या वाचकांची  राहण्याची चहा भोजन व राहण्याची व्यवस्था ट्रस्ट तर्फे करण्यात येणार आहे.