वाडीत आयुष वाडी डॉक्टर असोसिएशनची स्थापना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ सप्टेंबर २०१९

वाडीत आयुष वाडी डॉक्टर असोसिएशनची स्थापना


नागपूर/प्रतिनिधी:

मानवाने अस्तित्वाच्या सुरक्षेसाठी समूहात राहायला सुरुवात केली व त्यातून समाज व सामाजिक जीवन अस्तित्वात आले. व्यक्तींचे वैयक्तिक जीवन व सार्वजनिक जीवन यांचा संबंध जाणून घेण्याचे कार्य आयुष वाडी डॉक्टर संघटनेनी करावे . शेवटी प्रत्येक मनुष्य हा समाजाचा मूलभूत घटक असतो असे प्रतिपादन आ . समीर मेघे यांनी केले .

वाडी टी पॉईंट जवळील हॉटेल सॉलीटेरी मध्ये रविवार २२ सप्टेंबर रोजी आयुष वाडी डॉक्टर असोसिएशनच्या स्थापना निमीत्य आयुर्वेदीक व होमीयोपॅथी डॉक्टरांचा महामेळावा घेण्यात आला त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते . मंचावर डॉ . विजय गजभिये , डॉ . नाना पोजगे,माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक नरेश चरडे , डॉ .प्रशांत रडके, डॉ .राहूल भोपाले, आनंदबाबू कदम , नगरसेवक दिनेश कोचे ,केशव बांदरे , राकेश मिश्रा , कैलाश मंथापूरवार , राकेश मिश्रा, प्रामुख्याने उपस्थित होते .सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात द्विपप्रज्वलीत व सरस्वती मातेच्या प्रतीमेला हारार्पण करून करण्यात आली .

यावेळी आ . समीर मेघे यांच्या हस्ते डॉ . नाना पोजगे , प्राचार्या नंदीनी पोजगे व डॉ . अनिल गवळी यांचा सहकुटूंब तसेच पत्रकार अरुण कराळे यांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ व भेटवस्तू सत्कार करण्यात आला . प्रास्ताविकतेतुन डॉ . अश्विन सुळे यांनी सांगीतले की डॉक्टरांनी वैयक्तीक स्वार्थ न पाहता गोरगरीब रुग्णांना औषधोपचार करणे , योग शिबीर तसेच रोगनिदान शिबीराचे आयोजन करणे, डॉक्टरांना संघटीत करणे , डॉक्टरांमध्ये असणारा दुरावा कमी करणे अश्या प्रकारचे उपक्रम राहणार आहे . संचालन डॉ . विकास चिटमूलवार व आभार प्रदर्शन डॉ . राहूल पाचकवडे यांनी केले . यावेळी डॉ .रीशीता वैद्य, डॉ . अर्जुन खाडे , डॉ . धीरज कडूलकर , डॉ . मनीष चव्हाण , डॉ . अश्विन गाडे, डॉ . कौशल पांडाघरे, डॉ . आशीष मेश्राम , डॉ . राहूल देशमुख , डॉ .पंकज पाटील , डॉ . गीता विश्वकर्मा , डॉ .सी.डी. जांभुळकर , डॉ . नितीन शेडामे , डॉ . धर्मेश खाडे , डॉ . अनंता फुके , डॉ . राजकुमार भगत , डॉ . जयंत श्यामकुवर, डॉ . वर्षा मावळे , डॉ . सोनाली सोनी , डॉ . कल्पना चुटे प्रामुख्याने उपस्थित होते .