महावितरणच्या प्रादेशिक स्तरीय नाट्यस्पर्धेत चंद्रपूरच्या ‘ध्यानीमनी’ ने मारली बाजी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ सप्टेंबर २०१९

महावितरणच्या प्रादेशिक स्तरीय नाट्यस्पर्धेत चंद्रपूरच्या ‘ध्यानीमनी’ ने मारली बाजी


चंद्रपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक सभागृह अमरावती येथे पार पडलेल्या दोन दिवसीय आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेत चंद्रपूर परिमंडळाने सादर केलेल्या ‘ध्यानीमनी ’ या नाटकाने बाजी मारत सर्वोत्तम नाटकाच्या पुरस्कारासह विविध वर्गवरीतील पाच प्रथम आणि दोन व्दितीय पुरस्कारही पटकाविले आहे. तर, अमरावती परिमंडळाच्या ‘ एका ब्लॉकची गोष्ट’ या नाटकाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांच्या हस्ते वीजेत्यांना पुरस्कार वितरण करून सन्मानित करण्यात आले. यावेळी विजेत्यांना शुभेच्छा देत कलाकारांना प्रोत्साहित करतांना श्री. घुगल म्हणाले की, ज्याप्रमाणे वीज सेवा देतांना महावितरणचे लोक उन्ळाळा,पावसाळा,हिवाळा आणि जिव्हाळाही जपतात, त्याचप्रमाणे महावितरणच्या कलाकारांनी आपल्या कलागुणांनाही जोपावे, कारण जे लोक कला जपतात ते दिर्घ आयुष्यी आणि समाधानी राहत आपले आयुष्य सुकर करतात.

 तर ज्यांना या स्पर्धेत पारितोषिक मिळाले नाही त्यांनी निराश न होता पुन्हा जोमाणे प्रयत्न करावा असे आवाहन नाटय स्पर्धेच्या अध्यक्षा श्रीमती सुचित्रा गुजर यांनी केले. गोंदीया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांनीही सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्य अभियंता अनिल डोये,हरिष गजबे यांच्यासह मुख्य परिक्षक म्हणून डॉ.अनंत देव,आशाताई देशमुख आणि ॲड,चंद्रशेखर डोरले प्रामुख्याने उपस्थित होते.

सलग दोन दिवसाच्या या स्पर्धेत अमरावती परिमंडळाने सादर केलेल्या ‘ एका ब्लॉकची गोष्ट’ या नाटकात नाना ची भूमिका करणाऱ्या अभिजीत सदावर्ती यानी सलग तीसऱ्याही वर्षी पुरूष गटातून सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक पटकावले आहे. स्त्री गटातून ‘ध्यानीमनी’ मधील शालीनी म्हणजेच रोहिनी ठाकरे यांनी आपल्या कलागुणांची असीम छाप सोडत उत्कृष्ठ अभिनयाची माणकरी ठरली आहे.तर उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक ‘ध्यानीमनी’ चे दिग्दर्शक अनिल बोरसे यांना मिळाले आहे. ‘ एका ब्लॉकची गोष्ट’ मधील कुमारी अव्दिका कडू यांनी बालकलाकारांच्या भूमिकेतून नाटय प्रेक्षकांची मने जिंकल्याने त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिकही यावेळी देण्यात आले.

महावितरण नागपुर परिक्षेत्राअंतर्गत पार पडलेल्याया या स्पर्धेकरीता अकोला ,अमरावती ,नागपुर, चंद्रपूर आणि गोंदिया परिमंडळातील सर्व वरीष्ठ अधिकारी व नाटयरसिकांची मांदीआळी उपस्थित होती.या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन अतीरिक्त कार्यकारी अभियंता प्रदिप अंधारे , क्षिप्रा मानकर यांनी केले तर आभार सहाय्यक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख यांनी मानले.