महिला वीज कर्मचा-याला अश्लिल शिविगाळ;आरोपींविरोधात गुन्हा दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ सप्टेंबर २०१९

महिला वीज कर्मचा-याला अश्लिल शिविगाळ;आरोपींविरोधात गुन्हा दाखल


चंद्रपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या बल्लारशाह उपविभागांतर्गत असलेल्या पोंभुर्णा येथील 33 केव्ही उपकेंद्रात कार्यरत महिला यंत्रचालक कुमारी वैशाली दशरथ पेंदारे यांना वीजपुरवठा खंडित झाल्याच्या कारणास्तव अश्लिल शिविगाळ करून धमकी देणा-या अमोल देवतळे व अमित भांडेकर या दोन ग्राहकाविरोधात पोंभुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवार, दि. 12 सप्टेंबर रोजी दुपारी 4 च्या सुमारास पोंभुर्णा भागातील वीजपुरवठा 33 केव्ही उपकेंद्रात आलेल्या काही तांत्रिक कारणास्तव खंडित झाला होता, यावेळी स्थानिक रहिवासी अमोल देवतळे व अमित भांडेकर या दोघांनी 33 केव्ही उपकेंद्रात कार्यरत यंत्रचालक कुमारी वैशाली दशरथ पेंदारे या महिला वीज कर्मचा-यास मोबाईलवर कॉल करून वीजपुरवठा त्वरीत सुरु करा अन्यथा बघून घेण्याची घमकी देत अश्लिल शब्दात शिविगाळ केली. 

याप्ररकरणी स्थानिक पोंभूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलीसांनी या भारतीय दंड संहितेच्या कलम 504 व 507 अन्वये दोघांविरोधात शासकीय कर्मचा-यास धमकी व अश्लिल शिविगाळ केल्याप्रकरणी सार्वजनिक शांतता भंग करण्यासाठी जाणीवपुर्वक अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.