चंद्रपुर:प्रेमात सैराट होऊन पळून जातांना GF चा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ सप्टेंबर २०१९

चंद्रपुर:प्रेमात सैराट होऊन पळून जातांना GF चा मृत्यू


चंद्रपूर/ललित लांजेवार:


प्रेमात सैराट होऊन पडून जातांना एका 21 वर्षीय प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.भद्रावती तालुक्यातील खैरगाव येथील २१ वर्षीय कोमल राम गराटे, हिचे निंबाळा गावातील हेमंत दडमल या २५ वर्षीय युवकाशी प्रेम संबंध होते. रविवारी रात्री दोघांनीही पळून जाण्याचा प्लान आखला.

 त्यानंतर प्लान नुसार दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी विठ्ठल गेडाम यांच्या शेतातून मार्ग काढत पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न थेट कोमलला यमाच्या दारात खेचून घेऊन गेला.

या दरम्यान गेडाम यांच्या शेतातील जिवंत तारांना स्पर्श कोमलला झाला आणि विजेचा जोरदार धक्का लागल्याने कोमलचा जागीच मृत्यू झाला. 

प्रियकर हेमंत दडमल यांनी दोन वेळा मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यालाही ही विजेचा स्पर्श झाल्याने तोही बाजूला झाला. हे ठिकाण आनंदवन खैरगाव मजरा या गावाच्या मधोमध आहे. यानंतर प्रियकरानीं सकाळला वरोरा पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व हकीकत कथन केली.

त्यानंतर हा सर्व प्रकार उघडीस आला.मात्र पळून जायचा प्रेमीयुगुलांचा डाव वाटेतच घाव घालून मोडून काढला.या घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

प्रियकरांनी सकाळी परळी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व घटना सांगितली आता धक्कादायक घटना उघडीस आली आहे.
 Number 1 poultry feed in India