वेकोलि कामगार संघटनांचे निदर्शने - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ ऑगस्ट २०१९

वेकोलि कामगार संघटनांचे निदर्शने

सास्ती/प्रतिनिधी:
Demonstrations of Wacoli labor unions | वेकोलि कामगार संघटनांचे निदर्शने
 राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती, पोवनी, गोवरी कोळसा खाणीत भारतीय कोयला खदान मजदूर संघ, संयुक्त खदान मजदूर संघ व हिंद मजदूर सभा या कामगार संघटनांनी द्वारसभा घेऊन कोल इंडियाचे खासगीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन निषेध नोंदविला. यावेळी कामगार नेत्यांनी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. 

सरकार बहुमत असल्याने सार्वजनिक उद्योगातील कामगारांच्या हिताचे ४४ कायदे बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे कामगारांवर अन्याय होणार असुन त्याचा तीव्र विरोध करुन याविरुध्द होणाऱ्या संघर्षात कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. भर पावसात झालेल्या या सभेचे संचालन दिनेश जावरे यांनी केले. यावेळी कामगारांनी सरकार व व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी मोठया संख्येने कामगार उपस्थित होते