राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सेवाग्रामला भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ ऑगस्ट २०१९

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सेवाग्रामला भेट

राष्ट्रपतींचे राजभवन येथे आगमन

 

          

                      

        नागपूर, दि. 17: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सेवाग्राम येथून नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी मोटारीने राजभवनकडे प्रयाण केले. राजभवन येथील आगमनानंतर तेथील दोन तासाच्या वास्तव्यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी राजभवन येथून नागपूर विमानतळाकडे  प्रयाण केले.

            यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. राजभवन येथे केद्रिंय  भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रपती  कोविंद यांची भेट घेतली.

राष्ट्रपतींचे मुंबईसाठी प्रयाण

            राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नागपूर व सेवाग्राम वर्धा येथील नियोजीत कार्यक्रमानंतर दुपारी 4.05 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रिय विमानतळ येथून भारतीय वायु दलाच्या विशेष विमानाने मुंबईसाठी प्रयाण झाले. यावेळी त्यांच्या सोबत श्रीमती सविता रामनाथ कोविंद, कुमारी स्वाती कोविंद यांनी सुध्दा  प्रयाण झाले.

            विमानतळावर राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदाताई जिचकर, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजिव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भुषण कुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यावेळी राष्ट्रपती यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते.