सनी देओलला आवडली नागपूरची सीएनजी बस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ ऑगस्ट २०१९

सनी देओलला आवडली नागपूरची सीएनजी बस


नागपूर:
नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने ‘आपली बस’चे सीएनजी बसमध्ये परिवर्तन करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या सीएनजी बस प्रात्यक्षिकाला बुधवारी (ता.१४) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अभिनेते तथा खासदार सनी देओल यांनी सदिच्छा भेट दिली. रेशिमबाग येथील राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या स्मृती मंदिरातील पावन परिसरात हे प्रात्यक्षिक करण्यात आले. 

यावेळी मनपा परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रवीण दटके, विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, नगरसेवक रवींद्र भोयर, नगरसेविका उषा पॅलेट, शीतल कामडे, सहायक आयुक्त (परिवहन) किरण बगडे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, स्थापत्य अभियंता केदार मिश्रा, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, लेखा अधिकारी विनय भारद्वाज, बस ऑपरेटर सदानंद काळकर, रॉमेट मॅनेजर कौस्तुभ गुप्ता आदी उपस्थित होते. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून मनपाच्या मालकीच्या डिझेलवर संचालित २३७ स्टॅण्डर्ड बसेसचे रुपांतरण सी.एन.जी. इंधनावर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मनपाकडील डिझेलवर संचालित स्टॅण्डर्ड बसेस सरासरी १० वर्षे जुन्या झालेल्या असून परिवहन नियमान्वये बसेसचे आयुष्य संपूष्ठात आलेले आहे. या बसेस सी.एन.जी.मध्ये परिवर्तीत करून त्यांचा कार्यवाळ वाढवून त्या पुनर्जीवित करण्यात आलेल्या आहेत. 

परिवहन सेवेतील डिझेल बसेस सी.एन.जी.मध्ये परिवर्तीत करण्याचा पथदर्शी प्रकल्प परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या कार्यकालात सुरू झालेला असून हा देशातील एकमेव यशस्वी प्रयोग ठरलेला आहे, हे विशेष. या प्रकल्पातून निर्मित सी.एन.जी. बसेसच्या प्रात्यक्षिकाच्या पाहणीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खासदार सनी देओल यांनी परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय प्रकल्पाचेही त्यांनी कौतुक केले.