अखेर त्या अस्वलीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ ऑगस्ट २०१९

अखेर त्या अस्वलीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास !               मूल/प्रतिनिधी 

 येथील कर्मवीर महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला जखमी करणाऱ्या अस्वलीला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले. आज ता. 31 सकाळी ला उपजिल्हा रुग्णालया शेजारी राहणारे विवेक कामीडवार यांना सकाळी 6:30 वाजता दरम्यान  सदर अस्वल रुग्णालयातील शवविच्छेदन ग्रूहा जवळील झुडपात बसलेली दिसली. त्यांनी लगेच वन्यजीव प्रेमी उमेशसिन्ह झिरे यांना माहीती दिली. झिरे यांनी स्थानीय वन रक्षक मरस्कोल्हे यांना सोबत घेऊन उपजिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी अस्वल शवविच्छेदन ग्रूहाजवळील झुडपात बसली होती. झिरे यांनी ही माहीती विभागीय वनाधिकारी सोनकुसरे यांना दिली.  सोनकुसरे यांनी अस्वलीला लगेच जेरबंद करण्याचे आदेश दिले. अस्वलीला जेरबंद करण्यासाठी अतीशीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले. वनविभागाचे कर्मचारी व वन्यजीव प्रेमी यांचे मदतीने बंदुकीने अस्वलाला गुंगीचे इंजेक्शन मारण्यात आले. काही क्षणातच अस्वल बेशुद्ध झाली. बेशुद्ध अस्वलीला वन्यप्राणी उपचार केंद्र चंद्रपुरला हलविण्यात आले. अस्वल जेरबंद झाल्याने महाविद्यालय प्रशासन,विद्यार्थी आणि सर्व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. अस्वल जेरबंद करण्याचा कारवाईत विभागीय वनाधिकारी सोनकुसरे, चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर, श्रीमती चौहान,वसावे,प्राणी मित्र उमेशसिंह झिरे, तन्मयसिंह झिरे, क्षेत्रसहाय्यक खनके, शेन्डे, डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे बिट वनरक्षक मरस्कोले, गुरनुले, गेडाम, अतिशीघ्र दलाचे अधिकारी, कर्मचारी, अतिशिघ्र दल ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे सहभागी होते.