जटपूरा गेट वाहतूक कोंडीसाठी महापौर अंजली घोटेकर व जोरगेवार यांच्यात बैठक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ ऑगस्ट २०१९

जटपूरा गेट वाहतूक कोंडीसाठी महापौर अंजली घोटेकर व जोरगेवार यांच्यात बैठक


महापौर यांच्याशी १ तास चर्चा पहाणी करुन पर्यायी मार्ग होणार सुरु
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जटपूरा गेटवर होणा-या वाहतूक कोंडीमूळे नागरिकांना प्रचंड त्रास सहण करावा लागत आहे. यावर उपायोजना करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार वारंवार पाठपूरावा करत आहे. पून्हा एकदा किशोर जोरगेवार यांनी हा विषय चर्चेत आनला असून या विषयावर तोडगा काढण्यासाठी महापौर अंजली घोटेकर यांच्या सोबत एक तास चर्चा केली आहे. यावेळी किशोर जोरगेवार यांनी महापौर यांना काही सुजाव सुचविले असून गणपती उत्सवा नंतर यावर प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन महापौर यांनी दिले आहे. 

यावेळी किशोर जोरगेवार यांच्यासह शांतता समीतीचे नगरसेवक विशाल निंबाळकर, सदानंद खत्री, श्री. रंगारी सर (आर्कीटेक) आम आदमी पार्टिचे मुक्कू सोनी, कलाकर मल्लारप, नरेश मोटवानी, विलास सोमलवार, बबलु मेश्राम, सौरभ ठोंबरे, आदिंची उपस्थिती होती. 

चंद्रपूर शहरातील नागरिकांना शहराबाहेर जाण्याकरीता जटपूरा गेट हा एकमात्र मार्ग आहे. त्यामूळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यावर तोडगा काढण्यासाठी अणेकदा उपाय योजना करण्यात आल्यात. मात्र त्या असफल राहिल्यात. परिणामी येथे वाहणांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने कासवगतिने वाहण पूढे जात असतात. यात नारिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

 यावर तोडगा काढण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी पूढाकार घेत प्रशासनाला पर्यायी मार्ग सुजवीला होता. या मार्गाची पाहणी करण्यासाठी एका कमीटीचे गठण करण्यात आले होते. तत्कालीन पोलिस उपविभागीय अधिकारी सुशिल कूमार नायक या कमीटीचे अध्यक्ष होते. मात्र ईच्छा शक्तीच्या अभावी हा प्रश्न तसाच ताटकळत राहिला. त्यानंतर काल गूरुवारी एका हिंदी वृत्तपत्राच्या जनसंवाद कार्यक्रमा प्रसंगी हा विषय चर्चेत आला असता येथे उपस्थित किशोर जोरगेवार यांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महापौर अजंली घोटेकर यांना हा विषय सोडविण्यासाठी बैठक लावण्याची खुल्या मंचावरुन मगणी करत हा विषय पून्हा चर्चेत आनला यावेळी महापौर यांनी बैठक घेण्याचे आश्वासण दिले. 

त्यानूसार आज सकाळी १० वाजून ३० मिनीटांनी महापौर यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जटपूरा गेटच्या बाहेर निघारा मार्गावर अधिक वाहण चालतात तर शहरा बाहेरुन येणा-या वाहणांची संख्या कमी आहे. तरी जाणारा मार्ग १४ फुटांचा आहे तर तिकडून येणारा मार्ग हा ३१ फुटांचा आहे. 

त्यामूळे शहरातून बाहेर जाणा-या दुचाकी वाहणासाठी ३१ फुटांपैकीचा १० फुट मार्ग हा आरक्षीत करावा असा सुजाव यावेळी किशोर जोरगेवार यांनी सुचविला तसेच सपना टॉकीज बाजूचा मार्ग सरई होऊन गंज वार्डात निघतो त्यामूळे अर्धि ट्राफीक या मार्गाने वळती करावी असा सूजाव यावेळी किशोर जोरगेवार यांनी महापौर यांना केला. महापौर यांनीही या सुचनांवर गांर्भियाने विचार करत गणेश उत्सवानंतर या मार्गाची पहाणी करुन प्रायोगिक तत्वार यावर उपायोजना करण्यात येईल असे आश्वासन किशोर जोरगेवार यांना महापौर यांनी दिले.