बळसाणे येथील जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ ऑगस्ट २०१९

बळसाणे येथील जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

महापर्युषण पर्वाला सोमवारपासून सुरुवात 
 गणेश जैन / धुळे
बळसाणे : जैन धर्माच्या चातुर्मासातील अत्यंत महत्त्वाचा गणला जाणारा पर्युषण पर्वाला सोमवार पासून मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली तसेच साक्री तालुक्यातील बळसाणे येथील जैन मंदिरांना पर्युषण पर्वा निमित्ताने जैन मंदिराच्या कळसांवर व गाबाऱ्याला विद्युत रोषणाई ने व परिसराला प्रकाशाचा झोतात लखलखीत करण्यात आले आहे रात्री च्या वेळी गाबाऱ्यात दिपकाच्या अग्नी ज्योताने मंदिर शोभून उठते आहे दरम्यान मुर्तीपुजक संप्रदायाचे पर्युषण पर्वाला सोमवार पासून तर स्थानकवासी संप्रदायाचे मंगळवार पासून पर्युषण पर्वाला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली व दिगंबर संप्रदायाच्या पर्युषण पर्वाची सुरुवात २ सप्टेंबर पासून होत आहे.
 पर्युषण पर्वाच्या काळात  येथील मंदिराच्या मुर्तीची अंगी येथील पुजारी मनिशंकर महाराज व अंकित महाराज महाराज यांनी केली 
   गावातील जैन मंदिरात व विश्वकल्याणकाच्या जैन मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली याअंतर्गत विश्वकल्याणकाच्या विमलनाथ भगवानाच्या जैन मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई येथील ट्रस्टी महावीर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तसेच श्रीमती जसुमतिबेन बिपीनभाई शहा हस्ते डॉ. संजयभाई शहा , सुरत व नंदुरबार शहा परिवार मुख्य लाभार्थी असल्याचे सांगण्यात आले याठिकाणी ता. २६ आँगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान पर्युषणपना निमित्त श्री श्वेतांबर मुर्तीपुजक  जैन श्रीसंघ बलसाणा आणि श्री विश्वकल्याणक जय विमलनाथ भुमी ट्रस्ट , बलसाणा यांच्या तर्फे विविध प्रकाराचे धार्मिक कार्यक्रम पर्युषण पर्वात घेण्यात येतील असे पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज यांनी सांगितले पर्युषण पर्वाच्या पहिल्या च दिवशी विमलनाथ भंगवंताची रेखीव व सुंदर अशी अंगरचना करण्यात आली होती त्याचप्रमाणे मुर्तीला सतत व गाबाऱ्याला सजावटीचे काम रोज सुरू राहील असे ट्रस्ट गणांनी सांगितले व सकाळी ७ वाजता विमलनाथ भगवानाचे व अन्य मुर्तींचे अभिषेक , केशर पुजा , धुप पुजा , स्नात्र पुजा असे नाना प्रकाराचे धार्मिक विधी ने झाले यावेळी गावातील विमलनाथ जैन मंदिराचे पुजारी गिरीश भाई जैन व मनिशंकर भाई जैन व विश्वकल्याणक मंदिराचे पुजारी अंकित भाई जैन व राजेश भाई जैन हे महापर्व काळात परिश्रम घेत आहेत तसेच गावातील कवरलाल छाजेड ,सुभाष जैन , अशोक जैन , भागचंद जैन ,विजय जैन , हेमचंद जैन , दिलीप जैन , शांतीलाल खिंवसरा , शेषमल , छाजेड ,  मोतीलाल जैन , आशिष जैन , गौतम कुंमट , कांतीलाल जैन , किशोर जैन ,  हारकचंद जैन , किरण जैन , अभिषेक जैन , महावीर जैन , पिंटू जैन , राकेश जैन , भुषण जैन ,दर्शन जैन , प्रशांत जैन , योगेश जैन , परेश जैन , संयम जैन , जैनम जैन गावातील जैन समाजाच्या उपस्थित विधी पार पडले यावेळी महिला वर्गाची मोठी गर्दी होती तसेच विश्वकल्याणकाच्या मंदिरात चातुर्मासानिमित्ताने बळसाणे तीर्थाचे तीर्थोध्दारक परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन जी महराज व सुशिष्य परमपूज्य हेमवर्धनजी महाराज (आदी ठाणा , २ ) यांच्या नेतृत्वाखाली पहाटे , साडेचार वाजता ,  *राई प्रतिक्रमण* दुपारी २:३० वाजता पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज यांचे प्रवचन विश्वकल्याणक येथे , ४ वाजता , *मुनीश्री सोबत धार्मिक चर्चा* ,सायंकाळी सात वाजता *प्रतिक्रमण* आणि रात्री आठ वाजता *भक्ती कार्यक्रम*  भक्ती कार्यक्रम हा एक दिवस गावातील जैन मंदिरात व दुसऱ्या दिवशी विश्वकल्याणक येथील मंदिरात होईल दरम्यान ता. २८ रोजी गावातील जैन मंदिरात विमलनाथ भगवानाची सामुहिक पक्षाल अभिषेक , ता.३०  रोजी , सकाळी आठ वाजता चौदा स्वप्न व पाळणा बोली विश्वकल्याणक येथे संपन्न होणार आहे व दुपारी चार वाजता चौदा स्वप्न , पाळणा बोली चा कार्यक्रम गावातील विमलनाथ जैन मंदिरात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली व ता. १ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता बळसाणे गावातील मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात होणार असून शोभायात्रे ची सांगता विश्वकल्याणक येथे होणार आहे त्याचप्रमाणे ता. ३ रोजी सामुदायिक क्षमापण कार्यक्रम व बलसाणा जैन श्रीसंघा तर्फे स्वामीवात्सल्य दुपारी बारा वाजता विश्वकल्याणक येथे आयोजित केले आहे असे आवाहन बलसाणा जैन श्री संघाने केले आहे

 *विश्वकल्याणक मंदिरात धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल*

ता. २६ रोजी बळसाणे तीर्थोध्दारक परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज तथा सुशिष्य परमपूज्य हेमवर्धनजी महाराज यांच्या निश्रायाखाली सुत्रवाचन केले जाते आहे व दुपारी कल्पसुत्र वाचन तसेच दुपारी धार्मिक चर्चा व स्पर्धा , सायंकाळी सात वाजता प्रतिक्रमण व रात्री आठ वाजता प्रसिद्ध संगीतकार आशिष कुमार अँड पार्टी जालना , सध्याच्या परिस्थितीत भाविक धार्मिक भजन ऐकून मंत्रमुग्ध होत आहे  तसेच बळसाणे तीर्थाचे बाल संगीतकार रोनक अँड भुमिका यांचाही भक्तीसंध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे विजय राठोड व कमलेश गांधी , सुरेंद्र टाटीया यांनी सांगितले