शहरातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ ऑगस्ट २०१९

शहरातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील

  •  महापौर नंदा जिचकार यांचा विश्वास 
  • कुसूम सहारे स्मृती विदर्भस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन


  •   गतविजेत्या नवरंग संघाचा सलामी विजय   

नागपूर/प्रतिनिधी 
आज नागपूर शहरात विकास कामांसह सर्वत्र क्रीडा वातावरण निर्मिती होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवामुळे त्यात अधिक भर घातली गेली आहे. नागपूर महानगरपालिका आणि आई कुसूम सहारे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भस्तरीय फुटबॉल स्पर्धा मागील अनेक वर्षांपासून विदर्भातील प्रतिभावंत खेळाडूंना महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडूंनी आपला ठसा उमटविला आहे. फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून विदर्भातील खेळाडूंना मोठी संधी निर्माण करून देण्याचे कार्य आयोजक आरोग्य समितीचे उपसभापती नगरसेवक नागेश सहारे यांच्यामार्फत होत आहे. हे कार्य पुढेही असेच सुरू राहिल्यास लवकरच विदर्भासह आपल्या नागपूर शहरातून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. 
15 व्या आई कुसूम सहारे स्मृती विदर्भास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे गुरुवारी (ता. 1) रेशीमबाग मैदानावर महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, शिक्षण समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, माजी आमदार मोहन मते, स्पर्धेचे आयोजक नगरसेवक नागेश सहारे, नगरसेवक सतीश होले, नगरसेवक दिनेश यादव, मनपाचे क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल, क्रीडा प्रशिक्षक एस. जे. अॅन्थोनी, सुनील नांदुरकर, आई कुसुम सहारे फाऊंडेशनचे सचिव अॅडविन अॅन्थोनी, आई कुसुम सहारे फाऊंडेशनचे उपाध्यक्ष पीयूष पाटील, लालाजी पांडे, धीरज मानवटकर, दशरथ पांडे, जयंत टेंभुर्णे, विजय ढवळे, किशोर गौर, आजम खान, चिंटू मेश्राम, राजू कोसे, शैलेश तिनखेडे उपस्थित होते. प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी फुटबॉलला किक मारुन स्पर्धेचे उद्घाटन केले. स्पर्धेचा उद्घाटन सामना गतवर्षीचा विजेता संघ नवरंग क्रीडा मंडळ (अजनी) व उपविजेता हिलटॉप क्रीडा मंडळ (सेमीनरी हिल्स) यांच्यात झाला. सामन्यापूर्वी महापौर नंदा जिचकार यांनी उभय संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन पीयूष पाटील यांनी तर आभार अॅडविन अॅन्थोनी यांनी मानले.