सीटीपीएस-खैरगाव शेतशिवारात मगरीचे रेस्क्यू ऑपरेशन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ ऑगस्ट २०१९

सीटीपीएस-खैरगाव शेतशिवारात मगरीचे रेस्क्यू ऑपरेशनवनविभाग आणि इको-प्रो टीम ची संयुक्त मोहिम

चंद्रपुर: काल सांयकाळी सीटीपीएस खैरगाव शेतशिवारात पुराच्या पाण्यात आलेल्या मगरीला रेस्क्यू करून वनविभाग व इको-प्रो टीम ने सुरक्षित स्थळी सोडले.

चंद्रपुर: शहरात सुरु असलेल्या मागील सप्ताह भरापासुन सततधार पावसामुळे नदया दुथळी भरून वाहत आहेत. अशातच इरई धरण भरले असल्याने धरणाचे सातही दरवाजे खोलण्यात आले आहे. त्यामुळे धरण लगतच्या गावाच्या शेतशिवरत पाणी भरले आहे. या पाण्यासोबत एक 5 फुट लांब मगर सीटीपीएस लागून असलेल्या आणि नदी काठावर असलेल्या खैरगाव च्या शेतशिवारात आली. पाणी ओसरल्यानंतर शेतात आलेली मगर गावकरीना दिसून आली, त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली. नागरिकांनी यांची माहिती वनविभाग व इको-प्रो ला दिली, चंद्रपूर वनविभाग ची टीम व इको-प्रो सदस्य घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग चे मिलिंद किटे, बेग आणि इको-प्रो चे सुमित कोहले यांनी रेस्क्यू के काम सुरु केले. मगरिस जाळीत घेण्यात यश आले. नागरिकांच्या प्रचंड गर्दी आणि आरडा-ओरड सुरु असल्याने रेस्क्यू ऑपरेशन मधे अडचणी निर्माण होत होत्या. मगर जाळीतुन सुटकेचा प्रयत्न करित होती. इको-प्रो वन्यजीव संरक्षक दल सह संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, मानद वन्यजीव रक्षक सुद्धा पोहचले. यानंतर नागरिकांना शांत करित सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले. जाळीत आलेल्या मगरीचे आधी तोड़ बांधून व्यवस्थितरित्या रेस्क्यू करण्यात आले, आणि वनवीभागाच्या वाहनाने जंगलाच्या दिशेने नेण्यात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला.

यानंतर रेस्क्यू टीमने वनविभाग चे वरिष्ठ अधिकारी जी. गुरुप्रसाद, उप संचालक बफर, अशोक सोनकोसरे, विभागीय वन अधिकारी यांचेशी चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन मधे सदर मगरीला बफर अंतर्गत येणाऱ्या मोहर्ली वनक्षेत्रातील इरई धरणात सोडन्यात आले. यावेळी मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, आगरझरी क्षेत्राचे वनपाल भूषण गजापूरे आणी कर्मचारी, चंद्रपूर वनविभाग कर्मचारी उपस्थित होते तसेच रेस्क्यू ऑपरेशन मधे वनविभाग चे ए आर बेग, एम कीटे, नंदू पडवे, धीरज दहेगावकर, वनमजूर के जी डांगे, एस जी रायपुरे, अंकित पड़गिलवार, स्थानिक नागरिक गोवर्धन जेंगठे, महेश खेरे, यादव तसेच इको-प्रो वन्यजीव रेस्क्यू दल चे आशीष मस्के, अमोल उत्तलवार, हरीश मेश्राम, सागर कावले, बीमल शहा, अभय अमृतकर, सचिन धोतरे, अतुल राखूंडे, सूरज कावले, महेश होकर्ने यांनी सहकार्य केले.