बळीराज धोटे अटक प्रकरण:३५ सामाजिक राजकीय संघटनानकडून निषेध;जिल्हाधिकारी,व पोलीस अधिक्षकांना निवेदन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ ऑगस्ट २०१९

बळीराज धोटे अटक प्रकरण:३५ सामाजिक राजकीय संघटनानकडून निषेध;जिल्हाधिकारी,व पोलीस अधिक्षकांना निवेदन


चंद्रपुर/प्रतिनिधी:
 येथील प्रतिष्ठीत समाजसेवक व सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे संघटक बळीराज धोटे यांच्यावर दोन दिवसापासुन सावली, चंद्रपुर व ईतर ठीकाणी सामाजीक माध्यमांवर काही पोस्ट संदर्भात राजकीय दबावाखाली तक्रारीवरुण अटक करण्यात आली. ही अटक अन्यायकारक आहे. यासदर्भात आज दि. 26 ऑगस्टला जिल्ह्यातील विविध सामाजीक, राजकीय संघटना तर्फे जिल्हाधिकारी, जिल्ह्या पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले.


राजकीय दबावतंत्राच्या माध्यमातुन बळिराज धोटे यांच्यावर सावली, चंद्रपुर, बल्लापुर, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच भाजपाच्या कार्यकत्यांनी चंद्रपुर, बल्लारपुर येथे धोटे यांचा पुतळा जाळण्याचे कृत्य केले. त्यामुळे भाजपा कार्यकर्तांनवर सुध्दा गुन्हा दाखल करण्याची मागनी निवेदनातुन करण्यात आली. यावेळी नीवेदन देताना संभाजी ब्रीगेड, सत्यशोधक समाज, बामसेफ, भारत मीशन सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, प्रबोधन विचार मंच, महाराष्ट्र अंधश्रध्दा निमुर्लन समीती, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षकत्तेर कर्मचारी संघटना, काॅन्स्टीट्युशनल एजिटेशन फोरम, बहुजन एम्प्लाईज फेडरेशन, मुस्लीम आरक्षण संघर्ष समीती, आम आदमी पार्टी, भुमिपुत्र युवा एकता बहुउद्देशीय संस्था, राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस, बी.आर,एस.पी. वंचित बहुजन आघाडी, मनसे, जिजाऊ रमाई संघटना, समता सैनिक दल, सेवादल, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक संघटना, धनोजे कुणबी संघटना, सोशाॅलिस्ट पार्टी, गोंडवाना गणतंत्र पार्टी आदिच्या समावेश होता.

काय आहे धोटे अटक प्रकरण ?


शहीद भगतसिंग यांच्याविरुद्ध चालवण्यात आलेल्या खटल्यात ब्रिटिशांची बाजू मांडणारा वकील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होता, अशी पोस्ट फेसबूकवर टाकल्याप्रकरणी सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटचे संयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी भाजप आयटी सेलचा कार्यकर्ता राहुल लांजेवार याने तक्रार केली होती. त्यावरून पोलिसांनी ही अटक केली. या घटनेमुळे दिवसभर शहरात तणावाचं वातावरण होतं. दरम्यान, न्यायालयानं धोटे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टविरोधात जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या. या तक्रारींची एकत्र दखल घेत पोलिसांनी धोटे यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी ही अटक कोणत्या पोस्टसाठी केली, हे जाहीर केले नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. धोटे यांना अटक केल्याची माहिती मिळताच काही लोकांनी रोष व्यक्त केला. तसेच पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना समर्थन जाहीर केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. अटक होण्यापूर्वी धोटे यांनी एक व्हीडीओ फेसबुकवर टाकत आपल्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोप केला. भाजप कार्यकर्त्यांनी धोटे यांच्या निषेधार्थ निदर्शनं करीत त्यांचा पुतळा जाळला. धोटे नेहमीच भाजपविरोधी आणि आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमात पोस्ट करीत असतात, असा आरोप करून त्यांना जिल्ह्यातून तडीपार करावं, अशी मागणी महापौर अंजली घोटेकर यांनी केली. या प्रकरणामुळे आता राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे.