चंद्रपुर पोलिसांचा तेलंगाणात दारू पिऊन धिंगाणा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ ऑगस्ट २०१९

चंद्रपुर पोलिसांचा तेलंगाणात दारू पिऊन धिंगाणा

चंद्रपूर/प्रतिनिधी:

दारू पिऊन दुसऱ्र्या राज्यात धिंगाणा घालने २ पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे,चंद्रपूर येथील राजुरा ठाण्यातील पोलीस कर्मचारी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गोमलाडू व शिपाई भोयर असे या २ पोलिसांचे नाव आहे.या पोलीस अधिकाऱ्यांनी आसीफाबाद येथील गणेशपूर वाकडी येथील बैल बाजारात काम करणाऱ्या मजुरांना बंदुकीचा धाक दाखवून परिसरात दहशद निर्माण केली.या प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी या पोलीस उपनिरीक्षक आणि शिपायाला ताब्यात घेतले. 


दोन राज्याचा सीमा असल्याने गोयगाव येथे महाराष्ट्रातून येणारे मालवाहू ट्रक थांबतात. येथे जाऊन त्यांनी काहींशी हुज्जत घातली. यावर काही ट्रकचालकांनी तेलंगणा पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर लगेच तेलंगणा राज्याचे पोलीस तिथे आले. तरीही पोलीस उपनिरीक्षकाचा धुडगूस सुरूच होता. मद्यधुंद अवस्थेत त्याला साधे उभेही राहता येत नव्हते. तरीही तो समोरील लोकांशी हुज्जत घालत होता. हा सर्व प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे. यात चालक आपल्याला पोलिसांनी मारहाण केली आणि पैसे हिसकावल्याचे सांगत आहे. अखेर या पोलिसाला तेलंगणा पोलीस आपल्या गाडीत बसविण्यासाठी नेत असतानाच त्याला नागरिकांकडून चांगलाच चोप दिला,चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदी आहे. 

त्यामुळे अनेक तळीराम दारूची हौस भागविण्यासाठी सुरू असलेल्या जिल्ह्यात धाव घेतात अश्याच प्रकारातून हा प्रकार घडला असून याचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.आता या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.