आयुध निर्माणीच्या सर्व कर्मचाऱ्यांंचे परिवारसोबत डिफेन्स गेटसमोर भव्य प्रदर्शन मोर्चा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ ऑगस्ट २०१९

आयुध निर्माणीच्या सर्व कर्मचाऱ्यांंचे परिवारसोबत डिफेन्स गेटसमोर भव्य प्रदर्शन मोर्चा

नागपूर/अरूण कराळे:

भारत सरकार द्वारा आयुध निर्माणी  निगामीकरण करण्याच्या चुकीच्या निर्णयाला विरोध दर्शवण्याकरिता आयुध निर्माणीच्या सर्व कर्मचारी बंधूच्या परिवार जण सहित नागपुर- अमरावती महामार्गावरील दत्तवाडी डिफेन्स गेटसमोर शनिवार १७ ऑगस्ट रोजी भव्य प्रदर्शन काढण्यात आला .

आयुध निर्माणी बचाव , खाजगीकरण हटावचे नारे देत महीला पुरुषांनी काढला भव्य मोर्चा काढला 
भारत देशात असणाऱ्या ४१  आयुध निर्माणी कारखान्यांचे  खासगीकरण  करण्याच्या नीती व निर्णयाविरोधात  डिफेन्स येथील आयुध निर्माणी कारखान्यातील कामगारांनी आयुध निर्माणी बचाव , खाजगीकरण हटावचे नारे देत महीला पुरुषांनी   मोर्चा काढला . प्रत्येक कामगाराच्या हातात निषेधार्थ फलक,आपापल्या संघटनांचे ध्वज घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करून कर्मचाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. 

या आंदोलनात आयुध निर्माणी अंबाझरीतील रेड युनियन, इंटक युनियन, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ व लोकशाही कामगार आघाडी यांनी आपआपसातील मतभेद बाजूला सारून कर्मचारी व देशाच्या हिताकरिता एकत्रित येऊन सरकारच्या विरोधात उभे राहून तीव्र आंदोलन सूरु आहेत. यावेळी बंडू तिडके, सुनील मंडाले , प्रवीण महल्ले ,  बी.बी.मुजुमदार, आशिष पाचघरे,दीपक गावंडे, विनोद रामटेके,  अरविंद सिंह, ओ.पी.उपाध्याय, ब्रिजेश सिंह,संजय वानखेडे, आर.पी.चावरे ,वेदप्रकाश सिंह प्रामुख्याने उपस्थित होते .