महाजनादेश यात्रेनिमित्त ५ ऑगस्टच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ ऑगस्ट २०१९

महाजनादेश यात्रेनिमित्त ५ ऑगस्टच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा

  भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल  यांचे आवाहन

सावली/प्रतिनिधी:- 

राज्याला प्रगतिपथावर आणणारे आपल्या राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण राज्यात फिरणार असून दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजी सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे सकाळी ९ वाजता या यात्रेचे आगमन होणार  आहे .यानिमित्ताने मा. मुख्यमंत्री यांच्या  स्वागत  सभेचे आयोजन राष्ट्रीय महामार्ग व्याहाड खुर्द   येथे करण्यात आले  असून या सभेला राज्याचे वित्त नियोजन व  वनमंत्री  तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, अदिवासी विकास व वन  राज्यमंत्री  तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री परिणयजी  फुके, मा. आमदार रामदासजी आंबटकर प्रदेश सरचिटणीस भाजपा, गडचिरोली - चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीशभैया शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे, माजी आमदार अतुलभाऊ देशकर,तसेच जिल्ह्यातील सर्व सभापती/ उपसभापती,  नगराध्यक्ष, जि. प./ प.स. सदस्य  यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

पुन्हा नव महाराष्ट्र घडविण्याच्या हेतूने पुन्हा आणू या आपले सरकार या निर्धाराने येणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आपल्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे येत आहे आपण या यात्रेचे स्वागत करण्यासाठी व यात्रेनिमित्य आयोजित स्वागत  सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे सावली तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ पाल यांनी केले आहे.